आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर डी. वाय. पाटील फार्मसीच्या अपेक्षा चित्रेचा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक

 आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर डी. वाय. पाटील फार्मसीच्या अपेक्षा चित्रेचा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक



कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी अपेक्षा चित्रे हिने सातारा येथील गौरिशंकर एज्युकेशन सोसायटीच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


या स्पर्धेत “आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI in Healthcare)” या समकालीन विषयावर अपेक्षा हिने अत्यंत प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक मांडणी केली. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकत तिने प्रथम क्रमांक पटकावला.


अपेक्षा चित्रेच्या या उल्लेखनीय यशामुळे डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.


या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले तसेच प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी अपेक्षा चित्रेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments