आजचे राशीभविष्य
बुधवार, २९ एप्रिल २०२६
वैशाख शुक्ल त्रयोदशी / चतुर्दशी
पराभव नाम संवत्सर
शके १९४८, संवत २०८२
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)
⏰ राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०
“आज उत्तम दिवस आहे”
(प्रदोष विशेष)
नक्षत्र – हस्त
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या. (हर्षण योग)
ग्रहयोग:
रवी षडाष्टक चंद्र, चंद्र प्रतियुती मंगळ, चंद्र केंद्र गुरू, चंद्र प्रतियुती शनी
२९ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर मंगळ आणि हर्षल ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात. मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला मनापासून आवडते. तुम्ही स्तुती प्रिय असतात. मात्र चांगले काय आणि वाईट काय हे तुम्ही सहज समजू शकतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाही. तुमच्यात उतावळेपणा असतो. झटपट निर्णय घेण्यात तुम्हाला आवडते. तुमच्या वागण्यात धीरगंभीरता असून तुम्ही इतरांशी प्रामाणिकपणाने वागतात. कोर्टकचेरी करण्याची पाळी आल्यास तुमच्यावर अन्याय होऊ शकतो किंवा तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुम्हाला लेखनाची आवड असते आणि तुम्ही वैचारिक लेखन करतात. जीवन यशस्वी होण्यासाठी तुम्ही सावधानतेने वागतात. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही रूढी आणि परंपरा मोडतात. इतरांना मदत करण्याचे तुम्हाला आवडते. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी असते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही अभ्यास वृत्तीच्या असून इतरांना योग्य सल्ला देतात.
व्यवसाय:- संगीतकार, सिनेमा लेखन, पटकथा लेखन, कादंबऱ्या लेखन, द्रवपदार्थ, रसायने, पांढऱ्या वस्तूंचा व्यापार.
शुभ दिवस :-सोमवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- निळा.
शुभ रत्न:- मोती, पोवळे, हिरा.
♈ मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आजचा दिवस सकारात्मक आहे. मात्र चंद्र-मंगळ प्रतियुतीमुळे उतावळेपणा टाळा. कामात यश मिळेल पण संयम आवश्यक आहे. संध्याकाळी मानसिक समाधान मिळेल.
♉ वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल. गुरूचा केंद्र योग लाभदायक ठरेल. नवीन संधी मिळतील.
♊ मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
कामात प्रगती होईल. विचारांमध्ये स्पष्टता येईल. मित्रांचा सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.
♋ कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
भावनिक ताण जाणवू शकतो. चंद्र-शनी प्रतियुतीमुळे चिंता वाढेल. मात्र गुरूचा आधार मिळाल्याने परिस्थिती सुधारेल.
♌ सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
नोकरी व व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
♍ कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
आज तुमचा दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे.
♎ तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
भागीदारीत लाभ होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. मन शांत राहील. आर्थिक स्थिती सुधारेल.
♏ वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
चंद्र-मंगळ योगामुळे रागावर नियंत्रण ठेवा. वाद टाळा. उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल.
♐ धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
आज भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
♑ मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामाचा ताण कमी होईल. स्थैर्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
♒ कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
मित्रांकडून मदत मिळेल. नवीन योजना आखाल. खर्च वाढू शकतो, काळजी घ्या.
♓ मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
सर्जनशील कामात यश मिळेल. चंद्र-गुरू योग लाभदायक आहे. मन प्रसन्न राहील.
— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 8087520521
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल, स्वभाव, भाग्योदय, आजार, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्या4दी माहिती अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा – 8087520521.

Comments
Post a Comment