शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची सदिच्छा भेट

 शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची सदिच्छा भेट   




  कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क 

शिवसेना नेते ,प्रवक्ते ,खासदार दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची प्रभादेवी मुंबई येथील कार्यालयात प्रसार माध्यम - दैनिक सोलापूर पुणे तरुण भारतचे विभागीय पत्रकार  माजी सामनाचे जिल्हा प्रतिनिधी आरोग्य मित्र राजेंद्र सदाशिव  मकोटे यांनी सदिच्छा भेट घेतली .



यावेळी त्यांच्या समावेत महाविस्तापक दीपक शिंदे हेही उपस्थित होते कोल्हापूरची बहुचर्चित गोकुळची येऊ घातलेली निवडणूक तसेच साडेतीन शक्ती पीठाच्या  महालक्ष्मी देवी सह दख्खन चा राजा जोतिबा विकास आराखडा आदिसंदर्भाने चर्चा करून सविस्तर माहिती खासदार राऊत यांनी जाणून घेतली . राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग 'या बहुचर्चित पुस्तकाच्या हिंदी इंग्रजी आवृत्ती प्रकाशन पाठोपाठ  आगामी काळात विभागीय स्तरावर चर्चासत्रे यांचे नियोजन करण्यात येणार आहे .

Comments