आजचे राशीभविष्य
🌞 रविवार, २६ एप्रिल २०२६
🗓️ वैशाख शुक्ल दशमी / एकादशी
पराभव नाम संवत्सर
शके १९४८, संवत २०८२
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क - 8087520521)
⏰ राहुकाळ - सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.००
✨ आज चांगला दिवस आहे.
🌙 नक्षत्र व राशी
नक्षत्र - मघा / (रात्री ८.२७ नंतर) पूर्वा फाल्गुनी
आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह.
🔭 ग्रहयोग
रवी त्रिकोण चंद्र
चंद्र केंद्र शुक्र
चंद्र केंद्र हर्षल
बुध केंद्र गुरू
शुक्र लाभ नेपच्यून
📌 टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.
♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज उत्साह वाढेल. नवीन संधी मिळतील. कामात यश मिळेल आणि आर्थिक लाभ संभवतो.
♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवादातून यश मिळेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. प्रवासाचे योग आहेत.
♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
घरगुती सुख मिळेल. मानसिक समाधान राहील. कुटुंबीयांचा आधार मिळेल.
♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. प्रतिष्ठा आणि मान वाढेल. दिवस अत्यंत अनुकूल.
♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
कामात प्रगती होईल. नियोजन यशस्वी ठरेल. आरोग्य सुधारेल.
♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
संबंधांमध्ये गोडवा वाढेल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
कामात स्थैर्य येईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ संभवतो.
♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्य साथ देईल. शिक्षण आणि प्रवासात यश मिळेल. नवीन संधी मिळतील.
♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक. संयमाने निर्णय घ्या. दिवस मध्यम राहील.
♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
भागीदारीत यश मिळेल. संबंध मजबूत होतील. नवीन योजना यशस्वी ठरतील.
♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
कामात व्यस्तता वाढेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. आरोग्याची काळजी घ्या.
📞 कुंडली, करिअर, विवाह, व्यवसाय मार्गदर्शनासाठी संपर्क करा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521.
२६ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शनी आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला शांतता आवडते तसेच तुम्ही एकांतात जास्त रमतात. तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड असते. तुम्ही दीर्घोद्योगी असून तुमच्यात चिकाटी असते. तुम्ही कार्यक्षम असतात. गूढ विद्या, हिप्नॉटिझम याबद्दल तुम्हाला आकर्षण वाटते. तुम्ही दिसायला आकर्षक आणि वैचारिक प्रगल्भता असते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असतात आणि तुम्ही सहज पैसे कमवू शकतात. मोठमोठ्या योजना तुम्ही पार पाडू शकतात. तुम्हाला प्रवासाची आणि मित्रमैत्रिणींची आवड असते. भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल तुम्ही आक्रमक पवित्रा घेतात. फार कष्ट न करता जीवनाचा आनंद घेण्याची तुमची वृत्ती असते. तुम्ही मनाने चंचल आणि लहरी असतात. तुम्ही छान छोकीने राहतात आणि भारी आणि टापटीप कपड्यांचे शौकीन असतात. तुमच्या प्रेम प्रकरणांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही व्यसने टाळली पाहिजेत.
व्यवसाय:- इंजिनीअर, खनिज, बांधकाम, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कोळसा, लाकूड, लोखंड, रेल्वे, संशोधन, लेखन, परिवहन खाते.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:- जांभळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मो
ती किंवा काळा हिरा.

Comments
Post a Comment