जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा 13 वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धेत विवान सोनी व सिद्धी कर्वे अजिंक्य वेदांत बांगड व हर्षदा सूर्यवंशी पाटील उपविजेते
जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा 13 वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धेत विवान सोनी व सिद्धी कर्वे अजिंक्य वेदांत बांगड व हर्षदा सूर्यवंशी पाटील उपविजेते
कोल्हापूर २८ ,सिटी न्यूज नेटवर्क
अयोध्या टॉवर दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा तेरा वर्षाखालील मुला मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडल्या स्पर्धेच्या अंतिम सहाव्या फेरीनंतर मुलांच्या गटात अग्रमानांकित इचलकरंजीचा विवान सोनी सहा पैकी सहा गुण मिळवून अजिंक्य ठरला. नववा मानांकित इचलकरंजीचा वेदांत बांगड पाच गुण व 23 टायब्रेक गुण मिळवून उपविजेता ठरला तर द्वितीय मानांकित कोल्हापूरचा अर्णव पोर्लेकरला पाच गुण व 20 टायब्रेक गुणासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. मुलींच्या गटात अंतिम सहाव्या फेरीनंतर द्वितीय मानांकित जयसिंगपूरच्या सिद्धी कर्वे ने पाच गुण व साडेएकोणवीस टायब्रेक गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. सहावी मानांकित कोल्हापूरची हर्षदा सूर्यवंशी पाटील ने पाच गुण व एकोणवीस टायब्रेक गुणासह उपविजेतेपद मिळविले. तृतीय मानांकित इचलकरंजीची सांची बजाज साडेचार गुणा सह तृतीय स्थानी राहिली. स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रमोद सोनी, आशिष बजाज, वर्षा ठक्कर व वृषाली सूर्यवंशी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भरत चौगुले मनिष मारुलकर व सचिन वनीरे उपस्थित होते. या स्पर्धा जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन व कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन ने प्रायोजित केल्या. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्विसेस चे कॅप्टन उत्तम पाटील यांनी हॉल उपलब्ध करून सहकार्य केले.
उत्तेजनार्थ बक्षीस पुढील प्रमाणे मुले:- दिविज कात्रुट कोल्हापूर अथर्वराज ढोले कोल्हापूर व शिवराज कामते कोल्हापूर
मुली:- श्रुती पांडव इचलकरंजी अवनी सूर्यवंशी इचलकरंजी व हिंदवी पाटील कोल्हापूर सोलापूर येथे पाच ते सात जून दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य 13 वर्षाखालील निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा अधिकृत संघ पुढीलप्रमाणे
मुले:- 1) विवान सोनी इचलकरंजी 2) वेदांत बांगड इचलकरंजी 3) अर्णव पोर्लेकर कोल्हापूर मुली:- 1) सिद्धी कर्वे जयसिंगपूर 2) हर्षदा सूर्यवंशी पाटील कोल्हापूर

Comments
Post a Comment