कोल्हापुरात नवोदितांसाठी मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर शुक्रवारपासून

 कोल्हापुरात नवोदितांसाठी मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर शुक्रवारपासून   





      कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क 

 चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने नवोदितांसाठी तीन दिवसाचे प्राथमिक बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे 'अयोध्या टॉवर' (पाचव्या मजल्यावरील हॉल) दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे हे प्रशिक्षण शिबिर सकाळी साडेनऊ ते साडेअकरा यादरम्यान होणार आहे. यामध्ये तज्ञ बुद्धिबळ प्रशिक्षाकडून शास्त्रोक्त पद्धतीने प्राथमिक बुद्धिबळाचे मार्गदर्शन होणार आहे. मुलांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाची नियमावली समजावून त्यांच्यात बुद्धिबळा विषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हे मोफत शिबिर आयोजित केले आहे. पाच वर्षावरील सर्व मुले-मुली यामध्ये सहभाग होऊ शकतात. सर्वांना मोफत प्रवेश आहे. मर्यादित प्रवेश असल्यामुळे इच्छुकांनी आपली नावे खालील व्यक्तींकडे त्वरित नोंदवावीत. 

1) भरत चौगुले - 7620067251                                    2) उत्कर्ष लोमटे - 9923058149                                   3) मनिष मारूलकर - 9922965173                                            4) प्रीतम घोडके - 8208650388

Comments