आजचे राशीभविष्य
🌞 शुक्रवार, २९ मे २०२६
अधिक ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी / (सकाळी ९.५१ नंतर) चतुर्दशी.
ग्रीष्म ऋतू. पराभव नाम संवत्सर.
शके १९४८, संवत २०८२.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
⏰ राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
🌙 चंद्रनक्षत्र - स्वाती / (सकाळी १०.३८ नंतर) विशाखा.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - तूळ. ( परीघ योग)
✨ आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
🔭 चंद्र त्रिकोण गुरू.
🔭 शुक्र केंद्र शनी.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. चंद्र गुरू योगामुळे आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रमंडळींकडून सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. प्रवासाचे योग संभवतात.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आज संयमाने वागणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना सौम्य भूमिका घ्या. शुक्र शनी योगामुळे नियोजनबद्ध कामातून लाभ मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) मन प्रसन्न राहील. नवीन कल्पना आणि योजनांना योग्य दिशा मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. मित्रांसोबत आनंददायी वेळ जाईल. आरोग्य चांगले राहील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) घरगुती वातावरण आनंददायक राहील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. चंद्र गुरू योगामुळे मानसिक समाधान लाभेल. एखादी जुनी चिंता दूर होईल. धार्मिक कार्यात रस वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) आज आत्मविश्वास वाढेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. प्रवासाचे योग संभवतात. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभाचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. बुध्दी आणि अनुभवाच्या जोरावर प्रगती साधाल. विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. शुक्र शनी योगामुळे स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात लाभ संभवतो.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्याच राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्व प्रभावी राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) व्यय स्थानी चंद्र आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक ताण टाळण्यासाठी संयम आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक आवक वाढेल. मित्रांकडून मदत मिळेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. चंद्र गुरू योगामुळे शुभ वार्ता मिळू शकते. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नवीन योजना यशस्वी ठरतील. वाहन चालवताना काळजी घ्या. कौटुंबिक सुख समाधानकारक राहील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) भाग्याची उत्तम साथ मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. प्रवासातून लाभ संभवतो. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील. मन सकारात्मक राहील.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) अष्टम स्थानी चंद्र असल्याने सावधगिरी आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. गूढ विषय आणि संशोधनात रस वाढेल. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments
Post a Comment