पोलिस भरतीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ‘अजिंक्य फौंडेशन’कडून सत्कार; अल्पावधीत क्लासची यशस्वी गगनभरारी

 पोलिस भरतीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ‘अजिंक्य फौंडेशन’कडून सत्कार; अल्पावधीत क्लासची यशस्वी गगनभरारी



कोल्हापूर  सिटी न्यूज नेटवर्क 

स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या ‘अजिंक्य फौंडेशन’तर्फे पोलिस भरतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. मिरजकर टिकटी येथील नूतन मराठी हायस्कूलजवळ सुरू असलेल्या या संस्थेने अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे.



गेल्या दीड वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘अजिंक्य फौंडेशन’मध्ये सरळसेवा भरती, पोलीस भरती, एमपीएससी, एसएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दिले जाते. संस्थेचे संचालक अजिंक्य आपके सर यांनी पुण्यात यशस्वीपणे क्लासेस चालवल्यानंतर कोल्हापूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवे व्यासपीठ निर्माण केले.



संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ७० विद्यार्थ्यांची अग्निवीर भरतीत तर ४९ विद्यार्थ्यांची पोलिस भरतीत निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना त्यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनीही संस्थेमुळे योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळाल्याची भावना व्यक्त केली.


ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अजिंक्य फौंडेशन कार्यरत आहे. कमी कालावधीतच संस्थेने विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करत यशाची गगनभरारी घेतली आहे.


दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात संस्थेत पाच दिवसांचा ‘अभ्यास महोत्सव’ आयोजित केला जातो. या महोत्सवात रोज तब्बल १२ तास स्वतः अजिंक्य आपके सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. या उपक्रमाचा लाभ महाराष्ट्रभरातील विद्यार्थी घेत असून, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


अधिक माहितीसाठी :

अजिंक्य फौंडेशन

नूतन मराठी हायस्कूलजवळ, मिरजकर टिकटी, कोल्हापूर

📞 +91 94202 56696

Comments