आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य

🌞 शनिवार, ३० मे २०२६




अधिक ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी / (सकाळी ११.५८ नंतर) पौर्णिमा.

ग्रीष्म ऋतू. पराभव नाम संवत्सर.

शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


⚠️ आज वर्ज्य दिवस आहे.


🌙 नक्षत्र - विशाखा / (दुपारी १.२१ नंतर) अनुराधा.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - तूळ / (सकाळी ६.३९ नंतर) वृश्चिक. (सकाळी ११.५८ नंतर विष्टी करण लागत आहे, जे अशुभ असते)


🔭 चंद्र प्रतियुती हर्षल.

🔭 चंद्र त्रिकोण नेपच्यून.


टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम स्थानी चंद्र आहे. आज अचानक घडामोडी संभवतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. चंद्र हर्षल प्रतियुतीमुळे उतावळेपणा टाळावा. संध्याकाळनंतर परिस्थितीत सुधारणा होईल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) सप्तम स्थानी चंद्र आहे. वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. भागीदारी व्यवसायात संयम आवश्यक आहे. नेपच्यूनच्या प्रभावामुळे भावनिक निर्णय घेणे टाळा. प्रिय व्यक्तींसोबत संवाद साधताना काळजी घ्या.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र मेहनतीमुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. उपासना आणि ध्यान लाभदायक ठरेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) पंचम स्थानी चंद्र आहे. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. कला आणि सर्जनशील क्षेत्रात प्रगती होईल. प्रेमसंबंधात सकारात्मक वातावरण राहील. चंद्र नेपच्यून योगामुळे कल्पनाशक्ती वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती वातावरणात बदल जाणवतील. वाहन चालवताना काळजी घ्या. मानसिक चंचलता वाढू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संध्याकाळी मन प्रसन्न राहील.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) तृतीय स्थानी चंद्र आहे. धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. भावंडांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. प्रवासाचे योग संभवतात. मात्र कागदपत्रांची काळजी घ्या.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) द्वितीय स्थानी चंद्र आहे. आर्थिक व्यवहारात संयम आवश्यक आहे. बोलण्यात गोडवा ठेवा. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद टाळा. चंद्र हर्षल योगामुळे अचानक खर्च संभवतो. धार्मिक कार्यात मन रमणार आहे.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. चंद्र नेपच्यून योगामुळे अंतर्ज्ञान प्रबळ राहील. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव टाळण्यासाठी शांत राहा. प्रवासात सावधगिरी बाळगा. गुप्त शत्रूपासून त्रास संभवतो. संध्याकाळनंतर परिस्थितीत सुधारणा होईल.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रपरिवारातून मदत मिळेल. नवीन योजना यशस्वी ठरतील. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. मात्र कोणावरही अति विश्वास ठेवू नका.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) दशम स्थानी चंद्र आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य कमी मिळेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. व्यवसायात नवीन निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) भाग्यस्थानी चंद्र आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. चंद्र नेपच्यून योगामुळे मन संवेदनशील राहील. भाग्याची साथ लाभेल.


कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521 


Comments