आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 रविवार, ३१ मे २०२६




अधिक ज्येष्ठ पौर्णिमा / (दुपारी २.१५ नंतर) प्रतिपदा.

ग्रीष्म ऋतू. पराभव नाम संवत्सर.

शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


✨ आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस आहे.


🌙 नक्षत्र - अनुराधा / (दुपारी ४.१२ नंतर) ज्येष्ठ.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.


🔭 रवी प्रतियुती चंद्र.

🔭 चंद्र त्रिकोण शनी.


टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम स्थानी चंद्र आहे. मानसिक चंचलता जाणवू शकते. आर्थिक व्यवहारात विशेष सावधगिरी बाळगा. रवी प्रतियुती चंद्र योगामुळे अहंकारामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. दुपारी ४ नंतर महत्त्वाचे निर्णय टाळावेत.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) सप्तम स्थानी चंद्र आहे. वैवाहिक जीवनात समजूतदारपणे वागावे लागेल. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. भागीदारी व्यवसायात लाभ संभवतो. शनीच्या त्रिकोण योगामुळे संयमाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. विरोधकांपासून सावध राहा. दुपारपूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शांत स्वभावामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) पंचम स्थानी चंद्र आहे. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. कला आणि सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. चंद्र शनी योगामुळे विचारपूर्वक घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती वातावरणात काही तणाव जाणवू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या. रवी प्रतियुती चंद्रामुळे भावनिक अस्थिरता वाढू शकते. दुपारनंतर शांत राहण्याचा प्रयत्न करा.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) तृतीय स्थानी चंद्र आहे. धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. मित्र आणि भावंडांचे सहकार्य मिळेल. लेखन, शिक्षण आणि संवाद क्षेत्रात यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) द्वितीय स्थानी चंद्र आहे. बोलण्यात संयम ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबीयांसोबत वेळ आनंदात जाईल. आर्थिक लाभ संभवतो पण खर्चही वाढतील. मौल्यवान वस्तू जपून ठेवा. धार्मिक कार्यात मन रमणार आहे.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. चंद्र शनी त्रिकोण योगामुळे संयम आणि मेहनतीचे फळ मिळेल. दुपारपूर्वीचा काळ विशेष अनुकूल आहे.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढू शकतो. मानसिक तणाव टाळण्यासाठी शांत राहा. गुप्त शत्रूपासून सावध राहा. प्रवासात अडथळे संभवतात. उपासना आणि ध्यान लाभदायक ठरेल.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. नवीन योजना यशस्वी ठरतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. दुपारनंतर वादविवाद टाळा.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) दशम स्थानी चंद्र आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांसोबत संवाद साधताना संयम आवश्यक आहे. मेहनतीचे फळ मिळेल. शनीच्या प्रभावामुळे दीर्घकालीन योजना लाभदायक ठरतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) भाग्यस्थानी चंद्र आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. प्रवासातून लाभ संभवतो. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. चंद्र शनी योगामुळे संयम आणि श्रद्धेमुळे कार्यसिद्धी होईल.


कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments