गोकुळला दिलेले ‘हलाल प्रमाणपत्र’ तात्काळ रहित करा ! - हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे गोकुळ प्रशासकांना निवेदन
गोकुळला दिलेले ‘हलाल प्रमाणपत्र’ तात्काळ रहित करा : हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे गोकुळ प्रशासकांना निवेदन
कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’ने ‘हलाल’ प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले आहे. परदेशात निर्यात करण्यासाठी या प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याचे कारण पुढे केले जात आहे; मुळात दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांना भारतात पुरेसा बाजार उपलब्ध असतांना आखाती देशात ही उत्पादने विकण्याची आवश्यकता काय ? अजून संपूर्ण भारतात गोकुळ दूध पोहोचले नसताना, ते मुस्लिम देशांना पाठवायचा अट्टाहास का केला जात आहे ? हलाल प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा हिंद’ ही संस्था हलालच्या पैशांचा वापर जिहादी आतंकवाद्यांचे खटले लढण्यासाठी करते, तर गोकुळचे दूध घेणार्यांचा पैसा जिहाद्यांच्या सुटकेसाठी खर्च होणार का ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे. त्यामुळे राष्ट्रहितासाठी ‘गोकुळ’चे ‘हलाल’ प्रमाणपत्र रहित करावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने गोकुळचे प्रशासक, तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना देण्यात आले. गोकुळच्या प्रशासकांनी यावर प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. ‘गोकुळ’ने हलाल प्रमाणपत्र घेण्याचा निर्णय रहित न केल्यास प्रसंगी गोकुळवर मोठा मोर्चा काढण्याची चेतावणी देण्यात आली.
या प्रसंगी महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रमसिंह जरग, सामाजिक कार्यकर्ते श्री. शशी बीडकर, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, बजरंग दलाचे श्री. प्रतिक कुलकर्णी, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सौ. साधना गोडसे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे, श्री. किरण कुलकर्णी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, शहराध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, श्री. श्रीकांत जाधव, पॉजिटिव्ह वॉच’चे श्री. शेखर धोंगडे, मानवाधिकार संघटनेचे श्री. राजेश वाघमारे, श्री. सुयोग काकतकर, हिंदू विधीज्ञ परिषदेचे श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धर्माधारित ‘हलाल प्रमाणिकरण’ व्यवस्था तात्काळ बंद करा
भारत सरकारच्या अधिकृत‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (FSSAI) आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची आवश्यकता काय ? त्यामुळे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धर्माधारित ‘हलाल प्रमाणिकरण’ व्यवस्था तात्काळ बंद केली पाहिजे. विविध ठिकाणी खर्च होणारा पैसा हा केवळ आणि केवळ मुसलमान वा इस्लामी देशांना मिळावा, हा यामागचा एक उद्देश आहे. जर हे दूध ‘हलाल’ आहे, तर ते घेण्यासाठी हिंदूंनी पैसे का द्यावेत ? त्यामुळे यावर वेळीच कठोर कारवाई न केल्यास देशाचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे गोकुळ दूध संघाचे ‘हलाल’प्रमाणपत्र तात्काळ रहित करावे आणि जे अध्यक्ष, संचालक यांच्या काळात हे प्रमाणपत्र घेतले त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी या प्रसंगी करण्यात आली.

Comments
Post a Comment