आजचे राशीभविष्य
🌞 गुरुवार, २८ मे २०२६
अधिक ज्येष्ठ शुक्ल द्वादशी / सकाळी ७.५७ नंतर त्रयोदशी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
⏰ राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज शुभ दिवस आहे."
✨ प्रदोष व्रत
🌙 चंद्र नक्षत्र - चित्रा / सकाळी ८.०९ नंतर स्वाती.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - तूळ.
🔭 रवी षडाष्टक चंद्र.
🔭 चंद्र प्रतियुती मंगळ.
🔭 चंद्र त्रिकोण शुक्र.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सप्तम स्थानी चंद्र आहे. वैवाहिक आणि भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. चंद्र-मंगळ योगामुळे उत्साह वाढेल, पण रागावर नियंत्रण ठेवा. सामाजिक संबंध दृढ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. नियमित कामातून लाभ संभवतो.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) पंचम स्थानी चंद्र आहे. सर्जनशील कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. गुंतवणुकीतून लाभ संभवतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्ता किंवा वाहनासंबंधी विचार पुढे सरकतील. आईचे सहकार्य लाभेल. मन प्रसन्न राहील. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) तृतीय स्थानी चंद्र आहे. धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांकडून मदत मिळेल. छोट्या प्रवासाचे योग आहेत. नवीन योजना यशस्वी ठरतील. मित्रपरिवारासोबत आनंददायक वेळ जाईल.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) द्वितीय स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्यात गोडवा राहील. कुटुंबीयांसोबत वेळ आनंदात जाईल. नवीन खरेदीचा योग संभवतो. महत्त्वाचे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्व आकर्षक बनेल. चंद्र-शुक्र योगामुळे कला आणि सौंदर्य क्षेत्रात लाभ मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. प्रतिष्ठा वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. गुप्त शत्रूपासून सावध राहा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवासाचे योग संभवतात.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक आवक चांगली राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. व्यवसायात लाभ संभवतो.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) दशम स्थानी चंद्र आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या वाढतील. नवीन कामाची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) नवम स्थानी चंद्र आहे. भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन अनुभव लाभदायक ठरतील.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) अष्टम स्थानी चंद्र आहे. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक ताण जाणवू शकतो. वादविवाद टाळावेत. चंद्र-मंगळ प्रतियुतीमुळे उतावळेपणा टाळा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521

Comments
Post a Comment