चेस असोसिएशन कोल्हापूर आयोजित बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिरास उत्साहात प्रारंभ

 चेस असोसिएशन कोल्हापूर आयोजित बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिरास उत्साहात प्रारंभ   




                                                                                             

कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क 

 अयोध्या टॉवर दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या तीन दिवसाचे मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर आज मोठ्या उत्साहात सुरू झाले. युवा उद्योजक पायोनियर इलेक्ट्रोमॅटीक प्रायव्हेट लिमिटेड चे महेश कुलकर्णी व मा.सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग कोल्हापूर च्या सुनीता नेर्लेकर-क्षीरसागर यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे, प्रीतम घोडके, भरत चौगुले व मनिष मारुलकर उपस्थित होते. नवोदित बुद्धिबळपटूंना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाचे नियम समजावून सांगून बुद्धिबळाची आवड निर्माण होण्यासाठी प्रामुख्याने हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये 64 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेस चे कॅप्टन उत्तम पाटील यांनी या शिबिरास हॉल उपलब्ध करून देऊन सहकार्य केले आहे.

Comments