आजचे राशीभविष्य
🌞 बुधवार, २७ मे २०२६
अधिक ज्येष्ठ शुक्ल एकादशी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
⏰ राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज व्यतिपात असल्याने वर्ज्य दिवस. महत्त्वाची शुभकार्ये टाळावीत."
🌙 नक्षत्र - चित्रा.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या / (संध्याकाळी ७.०० नंतर) तूळ.
🪔 कमला एकादशी.
🔭 चंद्र त्रिकोण बुध, चंद्र केंद्र गुरू.
टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल. बुधाच्या प्रभावामुळे विचारांमध्ये स्पष्टता येईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) लाभदायक ग्रहमान आहे. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवतात.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) चंद्र-बुध शुभ योगामुळे बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. नोकरीत कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. मन प्रसन्न राहील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची निर्माण होईल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल. प्रवासातून लाभ संभवतो. आर्थिक नियोजन योग्य प्रकारे पार पडेल. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक ताण जाणवू शकतो. मात्र संशोधन आणि गूढ विषयात प्रगती होईल. अचानक धनलाभाचे संकेत आहेत. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) दिवसभर चंद्र तुमच्या राशीत आहे. आत्मविश्वास वाढेल. कामात यश मिळेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. संध्याकाळनंतर मनातील अस्वस्थता कमी होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संध्याकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत येणार आहे. नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. कला आणि सौंदर्य क्षेत्रात प्रगती होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) व्ययस्थानी चंद्र असल्याने खर्च वाढू शकतो. आध्यात्मिक विषयात मन रमणार आहे. दानधर्म करण्याची इच्छा निर्माण होईल. काही गुप्त चिंता त्रास देऊ शकतात. संयम राखणे हिताचे ठरेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. मित्रपरिवारातून चांगले सहकार्य मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) दशम स्थानी चंद्रामुळे व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांची कृपा लाभेल. प्रतिष्ठा वाढेल. महिलांकडून सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) भाग्यवृद्धीचा दिवस आहे. धार्मिक प्रवासाचे योग संभवतात. गुरूच्या कृपेने अडचणी दूर होतील. मन सकारात्मक राहील. नवीन ज्ञान प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) अष्टम स्थानी चंद्र असल्याने आरोग्याची काळजी घ्यावी. कामात अडथळे येऊ शकतात. मात्र आर्थिक बाबतीत काही अनपेक्षित लाभ संभवतो. गूढ आणि आध्यात्मिक विषयात रुची वाढेल. संयमाने वागणे आवश्यक आहे.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments
Post a Comment