गोकुळ निवडणुकीसाठी महायुती सज्ज
जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक
छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. आज कोल्हापूरमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत गोकुळची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच एकत्रित लढवायची, यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक, जनसुराज्य पक्षीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्यासह महायुतीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. आजही ही बैठक अतिशय सकारात्मक वातावरणात झाली असून ह्या बैठकीत निवडणूक महायुतीमधील सर्व घटक पक्ष मिळून पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय झाला. महायुतीचे सर्व घटक पक्ष गोकुळची निवडणूक छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी ह्या नावाने लढवणार, असल्याची माहिती माजी मंत्री विनय कोरे यांनी बैठकीनंतर दिली.

Comments
Post a Comment