महाड सत्याग्रह शतकपूर्ती महोत्सवासाठी कोल्हापुरात रणशिंग; नाम.रामदास आठवले यांचे मार्गदर्शन
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जागतिक धम्म परिषद तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शतकपूर्ती महोत्सवाच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक कोल्हापूर येथील विश्रामधाम येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीस केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आगामी कार्यक्रमांचे नियोजन, संघटन बळकटीकरण आणि सामाजिक प्रबोधनाच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला राज्य संघटन सचिव शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, उपाध्यक्ष दीपक भोसले, मातंग आघाडीचे अध्यक्ष अण्णा वायदंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवाची रूपरेषा, जागतिक धम्म परिषद यशस्वी करण्यासाठीची तयारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. जागतिक धम्म परिषद आणि महाड चवदार तळे सत्याग्रह शतकपूर्ती महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Comments
Post a Comment