जिओचा नवा OTT पास: ₹200 मध्ये 15 OTT प्लॅटफॉर्म्स, 1000 हून अधिक टीव्ही चॅनेल्स आणि 30GB डेटा
• यूट्यूब प्रीमियम, प्राइम व्हिडिओ आणि जिओहॉटस्टारसह 15 OTT प्लॅटफॉर्म्स एका पॅकमध्ये
• 28 दिवसांच्या वैधतेसह भरपूर मनोरंजन आणि डेटा सुविधा
• MyJio अॅप, जिओ वेबसाइट आणि रिचार्ज अॅप्सद्वारे OTT पास त्वरित अॅक्टिव्ह करता येणार
मुंबई, 27 सिटी न्यूज नेटवर्क
वेगवेगळ्या OTT अॅप्ससाठी वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास टाळू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी जिओने नवा ऑफर सादर केला आहे. कंपनीने ₹200 किमतीचा नवीन Jio OTT Pass लॉन्च केला असून, या पॅकमध्ये ग्राहकांना 15 प्रीमियम OTT अॅप्स, 1000 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, 30GB हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड 5G सुविधा मिळणार आहे. या पॅकची वैधता 28 दिवसांची असेल.
या पॅकमध्ये यूट्यूब प्रीमियम, जिओहॉटस्टार मोबाईल + हॉलीवूड आणि प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन यांचा समावेश आहे. याशिवाय सोनीलिव्ह, झी5, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सन NXT, फॅनकोड, कांचा लंका, प्लॅनेट मराठी, चौपाल, होईचोई, टाइम्सप्ले आणि तरंग प्लस यांसारख्या आणखी 12 OTT प्लॅटफॉर्म्सचा लाभ जिओटीव्ही मार्फत घेता येणार आहे. ग्राहकांना जिओटीव्हीवर 1000 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्सही पाहता येतील.
जिओच्या माहितीनुसार, या ऑफरमध्ये स्टार, सोनी, सन टीव्ही आणि डिस्कव्हरी नेटवर्कवरील विविध मनोरंजन, चित्रपट, क्रीडा आणि प्रादेशिक चॅनेल्सचाही समावेश करण्यात आला आहे.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे आधीपासून सक्रिय जिओ बेस प्लॅन असणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्राहक MyJio अॅप, Jio.com, रिटेल स्टोअर्स किंवा इतर रिचार्ज अॅप्सद्वारे ₹200 चा OTT Pass अॅक्टिव्ह करू शकतात.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, एकाच रिचार्जमध्ये मनोरंजन, लाईव्ह टीव्ही आणि इंटरनेट डेटा सुविधा मिळवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन हा पॅक तयार करण्यात आला आहे.

Comments
Post a Comment