आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 गुरुवार, २५ जून २०२६




निज ज्येष्ठ शुक्ल एकादशी / रात्री ८.१० नंतर द्वादशी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


✨ "संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे." *आज निर्जला एकादशी*


🌙 चंद्र नक्षत्र - स्वाती / दुपारी ४.२९ नंतर विशाखा.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ. सकाळी ७.०९ ते रात्री ८.१० विष्टी करण)


🔭 रवी केंद्र नेपच्यून.

🔭 चंद्र केंद्र शुक्र.

🔭 शुक्र त्रिकोण शनी.


📌 टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) भागीदारीच्या कामात यश मिळेल. चंद्र-शुक्र योगामुळे संबंधांमध्ये गोडवा वाढेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे व्यवहार संध्याकाळपूर्वी पूर्ण करावेत.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) कामाचा ताण वाढू शकतो, परंतु मेहनतीचे चांगले फळ मिळेल. शुक्र-शनी योगामुळे नियोजनबद्ध कामांना यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) विद्यार्थी आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. नवीन कल्पना यशस्वी ठरतील.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवादकौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. लहान प्रवास लाभदायक ठरतील.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्यातील प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. नवीन खरेदीचा योग संभवतो.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नवीन योजना आणि उपक्रम यशस्वी ठरतील. समाजात मान-सन्मान वाढेल.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. काही गोष्टींमध्ये संयम राखणे आवश्यक राहील. गुप्त लाभाची शक्यता आहे.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक स्थिती सुधारेल.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अचानक खर्च संभवतो. संशोधन व तांत्रिक क्षेत्रात यश मिळेल. मानसिक स्थैर्य राखल्यास दिवस समाधानकारक जाईल.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 8087520521

Comments