आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 शुक्रवार, २६ जून २०२६




निज ज्येष्ठ शुक्ल द्वादशी / रात्री १०.२३ नंतर त्रयोदशी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


✨ "संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे."


🌙 चंद्रनक्षत्र - विशाखा / (संध्याकाळी ७.१६ नंतर) अनुराधा.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ / दुपारी १२.३३ नंतर वृश्चिक.


२६  जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर शनि, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही चंचल आहात. नीटनेटकेपणा, सौंदर्य प्रसाधने, गुलाब पुष्प, गृह सजावट यांची तुम्हाला आवड आहे. मित्रणाबरोबर प्रवास प्रिय आहे. आर्थिक बाबतीत नशीबवान आहेत.तुम्ही उत्स्फूर्तआणि उत्साही आहात. प्रेमात अपयश येऊ शकते.  तुमच्या जीवनात बऱ्याचशा गोष्टी उशीराने घडतात. शिस्त, गांभीर्य, कर्तव्य याची जाणीव तुम्हाला प्रामुख्याने असते. तुम्ही सखोल विचार करणारे आणि स्थिर मनाच्या आहात. तुम्ही समतोल वृत्तीने सर्वत्र बघतात. कोणत्याही प्रश्नांची दुसरी बाजू तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तुमच्याबद्दल इतर लोकांचे बरेच गैरसमज असतात. तुम्ही तुमच्या कामामध्ये सतत मग्न असतात. तुम्ही धोरणी आणि चतुर आहात. निसर्ग, संगीत, सौंदर्य यांचे तुम्हाला आवड आहे. स्वतःच्या अधिकारांची तुम्हाला जाणीव असते. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला आपुलकी आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही उत्तम व्यवस्थापन करू शकतात. तुम्ही न्याय प्रेमी, कायदा प्रेमी आहात. तुमच्या आर्थिक नियोजन काटेकोर असते. तुम्ही इतरांना योग्य वेळी मदत करतात. तुम्ही दीर्घोद्योगी आहात आणि तुम्हाला आयुष्यात उशिरा यश मिळते मात्र ते बराच काळ टिकते.


व्यवसाय:-  सर्वप्रकारची शास्त्र, स्टॅटिस्टिक्स, अवघड गणित, संशोधन, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, अकाउंट, पॅथॉलॉजी, वकील.


शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- जांभळा, हिरवा, राखाडी, गडद निळा.


शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू, काळा मोती. अमेथिस्ट, लसण्या.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


🔭 चंद्र प्रतियुती मंगळ.

🔭 चंद्र त्रिकोण बुध.

🔭 चंद्र त्रिकोण गुरू.


📌 टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


🐏 मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

भागीदारीच्या कामात यश मिळेल. चंद्र-बुध आणि चंद्र-गुरूच्या शुभ प्रभावामुळे महत्त्वाच्या चर्चा फलदायी ठरतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. संध्याकाळनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होईल.


🐂 वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

कामाचा ताण वाढू शकतो, परंतु नियोजनबद्ध कामातून यश मिळेल. विरोधकांवर मात कराल. आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळनंतर कामातील अडथळे दूर होतील.


👬 मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

विद्यार्थी, शिक्षक आणि लेखन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. चंद्र-बुध त्रिकोणामुळे बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता वाढेल. प्रेमसंबंधात आनंददायक घडामोडी संभवतात.


🦀 कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. मानसिक समाधान लाभेल.


🦁 सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवासाचे योग संभवतात. तुमच्या कल्पना आणि संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील.


👧 कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होतील. नवीन खरेदीचा योग संभवतो.


⚖️ तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

दुपारपर्यंत चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन संधींचा लाभ मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.


🦂 वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

दुपारनंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह वाढेल. चंद्र-गुरू त्रिकोणामुळे भाग्याची साथ लाभेल. नवीन योजना यशस्वी ठरतील. संध्याकाळनंतर अधिक अनुकूलता जाणवेल.


🏹 धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. संयमाने वागल्यास लाभ मिळतील.


🐐 मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक वाढेल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन संपर्क लाभदायक ठरतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.


🏺 कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. समाजात मान-सन्मान वाढेल.


🐟 मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. चंद्र-गुरूच्या शुभ प्रभावामुळे धार्मिक आणि सामाजिक कार्यात यश मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल.


कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments