आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

🌞 शनिवार, २७ जून २०२६




निज ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर – शके १९४८ – संवत २०८२


🌙 चंद्र – वृश्चिक राशीत

🌟 नक्षत्र – अनुराधा / (रात्री १०.११ नंतर) ज्येष्ठ


२७ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव. तुम्ही सुदृढ आहात. उत्तम वक्तृत्व, हरहुन्नरी स्वभाव ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला अधिक प्रिय आहे. जीवनातील खरा आनंद शिक्षण देण्यात आहेअसे तुम्हालावाटते. किरकोळ बाबींवर तुम्ही अस्वस्थ होतात. अहंकार असल्याने मित्र परिवार छोटा आटो. तुमचे व्यक्तिमत्वात विरोधाभास आहे. तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार आणि लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला पुर्ण विश्वास आहे. तुम्हाला शक्तिशाली खेळांची आणि व्यायामाची आवड आहे. इतरांवर तुम्ही दया करतात मात्र त्यातून तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळतो. आजारी लोकांना तुम्ही स्वतःचे क्षमतेने बरे करू शकतात. तुम्ही शीघ्रकोपी आहात मात्र स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतात. बौद्धिक क्षेत्रात काम करणे तुम्हाला आवडते. तुमचे विचार ठाम आहेत. तुम्हाला तुमची मुले आणि बहिणी जास्त प्रिय असतात. तुम्ही कायदा प्रेमी आहात. जबाबदारीच्या जागांवर तुम्ही काम करू शकतात. तुमची मनाची शक्ती अफाट असून तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्हाला प्रवासातून अनेक अनुभव येतात आणि त्यामुळे तुमचे जीवन परिपक्व होते. तुम्ही अभ्यासू वृत्तीचे आहात. इतरांच्या पेक्षा तुमचे विचार पुढे असतात. तुम्ही तुमच्या मतांशी ठाम असतात. विनाकारण इतरांची खोडी काढणे तुम्ही टाळले पाहिजे. आयुष्यात अहंकार आणि पोकळ दिमाख याला काही अर्थ नाही. तुम्ही बोलण्यामध्ये आणि वक्तृत्वात प्रवीण आहात. स्वतःची चूक तुम्ही कधीही मान्य करत नाहीत. इतरांवर टीका करणे टाळल्यास तुम्ही अधिक प्रगती करू शकाल.


व्यवसाय:-  हॉटेल व्यवस्थापन, संगीतकार, दाग-दागिने विक्री, बेकरी, गृहसजावट, पोलीस, मिल्ट्री, डॉक्टर, केमिस्ट, लोखंड, बांधकाम क्षेत्र, इंजिनिअर.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.


शुभ रंग:- तांबडा, पिवळा, पांढरा.


शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, मोती माणिक.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


🪔 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 (संपर्क – 8087520521)


⏰ राहुकाळ – सकाळी ९.०० ते १०.३०


✨ आज उत्तम दिवस आहे. *शनिप्रदोष*


🔭 ग्रहयोग – रवी षडाष्टक चंद्र, चंद्र त्रिकोण शनी, चंद्र प्रतियुती हर्षल, चंद्र त्रिकोण नेपच्यून


🔱 विशेष: शनिवार – शनिदेव, कर्म, संयम व न्याय यांचा दिवस; नियोजनबद्ध कार्य, सेवा आणि साधनेसाठी अत्यंत अनुकूल.


🐏 मेष (Aries)

भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या चर्चेत सकारात्मक निष्कर्ष मिळतील.

💡 उपाय: हनुमान चालीसाचे पठण करा.


🐂 वृषभ (Taurus)

कामाचा ताण वाढू शकतो, परंतु मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांवर मात कराल.

💡 उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.


👬 मिथुन (Gemini)

विद्यार्थी आणि बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. चंद्र-नेपच्यून योगामुळे कल्पनाशक्ती वाढेल.

💡 उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा.


🦀 कर्क (Cancer)

संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. सर्जनशील कार्यात यश मिळेल.

💡 उपाय: श्रीकृष्णाचे नामस्मरण करा.


🦁 सिंह (Leo)

घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल.

💡 उपाय: सूर्याला अर्घ्य द्या.


🌾 कन्या (Virgo)

पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रवासातून लाभ संभवतो. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.

💡 उपाय: विष्णू सहस्रनामाचा जप करा.


⚖️ तुळ (Libra)

आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन खरेदीचा योग संभवतो.

💡 उपाय: महालक्ष्मीची उपासना करा.


🦂 वृश्चिक (Scorpio)

तुमच्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र-शनी त्रिकोणामुळे नियोजनबद्ध कार्यात यश मिळेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे.

💡 उपाय: भगवान शिवाला जलाभिषेक करा.


🏹 धनु (Sagittarius)

खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या व्यक्तींकडून शुभवार्ता मिळू शकते.

💡 उपाय: गुरू मंत्राचा जप करा.


🪶 मकर (Capricorn)

मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक वाढेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल.

💡 उपाय: शनिदेवाला तेल अर्पण करा.


🏺 कुंभ (Aquarius)

कार्यक्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.

💡 उपाय: गरजू व्यक्तींना वस्त्रदान करा.


🐟 मीन (Pisces)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवास लाभदायक ठरेल. गुरूजनांचे मार्गदर्शन मिळेल.

💡 उपाय: विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments