आजचे राशीभविष्य
🌞 सोमवार, २९ जून २०२६
निज ज्येष्ठ पौर्णिमा. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
⏰ राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
🌙 चंद्र नक्षत्र - मूळ.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु.
"आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे." *(आज वटपौर्णिमा)*
🔭 रवी प्रतियुती चंद्र.
🔭 चंद्र केंद्र नेपच्यून.
📌 टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
🐏 मेष:-
भाग्याची उत्तम साथ लाभेल. दुपारनंतर महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास अनुकूलता मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
🐂 वृषभ:-
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनपेक्षित खर्च संभवतात. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. संयम आणि नियोजन लाभदायक ठरेल.
👬 मिथुन:-
भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. चंद्र-नेपच्यून योगामुळे कल्पकता वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. महत्त्वाचे निर्णय संध्याकाळनंतर घ्यावेत.
🦀 कर्क:-
कामाचा ताण वाढू शकतो, पण मेहनतीचे फळ मिळेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. दुपारनंतर कामातील अडथळे कमी होतील.
🦁 सिंह:-
संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. कला, साहित्य आणि सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.
🌾 कन्या:-
घरगुती वातावरण आनंददायी राहील. स्थावर मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल. दुपारनंतर लाभदायक बातमी मिळू शकते.
⚖️ तुळ:-
पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवादकौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. लहान प्रवासाचे योग संभवतात. नवीन संपर्क लाभदायक ठरतील.
🦂 वृश्चिक:-
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. नवीन खरेदीचा योग संभवतो.
🏹 धनु:-
राशीस्थानी पौर्णिमेचा चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस अनुकूल आहे. दुपारनंतर ग्रहमान अधिक लाभदायक होईल.
🐐 मकर:-
खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही जुन्या गोष्टींचा विचार मनात येईल. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयमाने वागल्यास दिवस समाधानकारक जाईल.
🏺 कुंभ:-
मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. दुपारनंतर एखादी आनंददायक बातमी मिळू शकते.
🐟 मीन:-
व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.
📿 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments
Post a Comment