आजचे राशीभविष्य
🌞 मंगळवार, ३० जून २०२६
निज ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
⏰ राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
"आज वृद्धी तिथी आहे."
🌙 चंद्रनक्षत्र - पूर्वाषाढा.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु.
🔭 चंद्र केंद्र शनी.
📌 टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
🐏 मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
भाग्याची साथ लाभेल. दुपारपूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासातून लाभ संभवतो. वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल.
🐂 वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. नियोजनबद्ध कामातून लाभ मिळेल. संयमाने निर्णय घ्या.
👬 मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)
भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या चर्चेत सकारात्मक निष्कर्ष मिळतील. सामाजिक संबंध दृढ होतील. दुपारनंतर कामाचा वेग कमी ठेवावा.
🦀 कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)
कामाचा ताण वाढू शकतो. चंद्र-शनी योगामुळे मेहनतीचे चांगले फळ मिळेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
🦁 सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)
संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. कला, साहित्य आणि सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.
🌾 कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)
घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल. स्थावर व्यवहारात लाभ संभवतो.
⚖️ तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. लहान प्रवासाचे योग संभवतात. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
🦂 वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्याच्या प्रभावामुळे कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत आनंददायक वेळ व्यतीत कराल. नवीन खरेदीचा योग संभवतो.
🏹 धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. चंद्र-शनी केंद्र योगामुळे संयम आणि चिकाटीने कामात यश मिळेल. महत्त्वाची कामे दुपारी ४ पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.
🐐 मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)
खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही जुन्या गोष्टींचा विचार मनात येईल. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयम आणि शांतता राखल्यास दिवस समाधानकारक जाईल.
🏺 कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)
मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक वाढेल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
🐟 मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)
व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.



Comments
Post a Comment