पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त रेनकोट वाटप व गुणवंतांचा सन्मान

 पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त रेनकोट वाटप व गुणवंतांचा सन्मान


कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क 


कोल्हापूरचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षानगर येथे सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. कौसर इस्माईल बागवान यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १८ मधील महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोटचे वाटप करण्यात आले.


याच कार्यक्रमात सौ. कमल कोळेकर यांची नागपूर येथे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रथमेश गुरुले यांची SRPF ग्रुप-१, पुणे येथे पोलीस पदासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.



या कार्यक्रमास उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, सामाजिक कार्यकर्ते इस्माईल बागवान, नगरसेवक अजय इंगोले, अश्फाक अगरेकर, प्राजक्ता जाधव, मंगल साळुंखे, अनुराधा खेडकर, संजय सावंत, शेखर मंडलिक, अत्तर मुल्ला, अजित साळुंखे, रवी लाड तसेच वर्षा विश्वास फुटबॉल क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी सत्कारमूर्तींच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक करण्यात आले तसेच त्यांच्या भावी सेवाकार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आणि समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.







Comments