ब्राह्मण सभा करवीरतर्फे मंगलधाम तर्फे श्रीराम यज्ञ संपन्न
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
जगभरात शांतता नांदावी. देशभरात चांगला पाऊस पडावा, बळीराजा सुखी व्हावा यासाठी शुक्रवारी ब्राह्मण सभा करवीरतर्फे मंगलधाम येथे राम पंचायतन हवन, श्रीराम यज्ञ करण्यात आला. यावेळी १००८ आहुतींचे हवन करण्यात आले. संस्थेतर्फे सुरू असलेल्या श्रीराम कथा सोहळ्याअंतर्गत हा धार्मिक उपक्रम राबवण्यात आला.
मंगलधामतर्फे दि. २२ ते २८ जुन दरम्यान राम गणेश गडकरी हॉल येथे मकरंद बुवा सुमत रामदासी यांचे श्रीरामकथा निरुपण सुरू आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी सकाळी ९ वाजता चांगले पर्जन्यमान आणि जागतीक शांततेच्या उद्देशाने श्रीराम यज्ञ करण्यात आला. सकाळी गणेश पुजन, पुण्यहवचन, राममूर्ती स्थापना, नवग्रह पुजन असे धार्मिक विधी तसेच त्यानंतर देवता पुजन करताना पुरश्चरण झाले. दरम्यान राम गणेश गडकरी हॉल येथे रामदासी यांचे रामकथा वाचन झाले. उद्या ग(रविवारी) सोहळ्याची सांगता दुपारी प्रसाद वाटपाने करण्यात येणार आहे.
यावेळी अध्यक्ष डॉ. दिपक आंबर्डेकर, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी, डॉ. उदय कुलकर्णी, श्रीकांत लिमये, नंदकुमार मराठे, प्रसाद खाडीलकर, रामचंद्र टोपकर, विवेक शुक्ल, पुजा जोशी, संतोष कोडोलीकर आदी उपस्थीत होते.

Comments
Post a Comment