मनसेच्या पक्ष पुनर्बांधणीसाठी यशवंत किल्लेदार यांचा कोल्हापूर दौरा
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार व नंदकुमार चिवले हे पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हा दौरा आयोजित करण्यात आला असून, कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची नव्याने उभारणी, नवीन चेहऱ्यांना संधी आणि संघटन विस्तार यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी यशवंत किल्लेदार इच्छुक कार्यकर्ते, युवा वर्ग तसेच राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. पक्षात नव्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्याबरोबरच संघटन मजबूत करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मनसेचे आजी-माजी पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसेच पक्षात काम करण्यास इच्छुक नवीन कार्यकर्त्यांनी शुक्रवार, दि. २६ जून रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आयोजित संवाद उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)दौलत पाटील, जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण) नागेश चौगुले आणि इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी केले आहे.
पक्ष पुनर्बांधणीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून, कोल्हापूर जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Post a Comment