आजचे राशीभविष्य
🌞 गुरुवार, १६ जुलै २०२६
आषाढ शुक्ल द्वितीया / सकाळी ८.५३ नंतर तृतीया. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
⏰ राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज उत्तम दिवस आहे."
🌙 चंद्र नक्षत्र - आश्लेषा / (संध्याकाळी ७.५२ नंतर) मघा.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क / (संध्याकाळी ७.५२ नंतर) सिंह.
🔭 चंद्र केंद्र प्लूटो.
📌 टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
🐏 मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रांच्या सहकार्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन योजना यशस्वी ठरतील. आत्मविश्वास वाढेल.
🐂 वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
दैनंदिन कामात प्रगती होईल. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
👬 मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. सर्जनशील कार्यात यश मिळेल. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील.
🦀 कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
राशीस्थानी चंद्रामुळे उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. मान-सन्मान मिळेल. नवीन संधींचा लाभ घ्यावा. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
🦁 सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
खर्चावर नियंत्रण ठेवा. नियोजनपूर्वक काम केल्यास यश मिळेल. आध्यात्मिक कार्यात मन लागेल. विश्रांतीलाही महत्त्व द्या.
🌾 कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
⚖️ तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडतील. प्रतिष्ठा वाढेल.
🦂 वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवासातून लाभ संभवतो. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. गुरूजनांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.
🏹 धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. गुंतवणूक विचारपूर्वक करा. संयम ठेवल्यास लाभ मिळेल. संशोधनात्मक कार्यात यश मिळेल.
🐐 मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. संबंध अधिक दृढ होतील. महत्त्वाच्या चर्चेत सकारात्मक निष्कर्ष मिळतील.
🏺 कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
कामाचा व्याप वाढेल, पण मेहनतीचे योग्य फळ मिळेल. विरोधकांवर मात कराल. आरोग्याची काळजी घ्या. नियमितपणा लाभदायक ठरेल.
🐟 मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
घरगुती वातावरण आनंददायी राहील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. मानसिक समाधान मिळेल.
१६ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये आणि आजचे राशिभविष्य:-
तुमच्यावर चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव परोपकारी आणि मिश्किल आहे. शांत दिसत असले तरी मनामध्ये घालमेल चालू असते.तुम्ही सतत कार्यमग्न असतात. संतती चांगली होते. तुमचा स्वभाव नम्र असतो. तुम्ही सतत सावध असतात. सूक्ष्म बाबीचे तुम्हाला आकर्षण असते. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यून असू शकते. आरोग्याच्या तक्रारी चालू असतात. वागण्यात विरोधाभास असू शकतो.
तुमची बौद्धिक पातळी उच्च दर्जाची असते. इच्छाशक्ती असल्यास तुम्ही जीवनात मोठे यश कमवतात. तुम्ही चाकोरी बाहेरचा विचार करतात. तुम्ही भावनाप्रधान असून कलेची आवड असते. दूरच्या प्रदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते आणि त्यामुळे तुमचा परदेशाशी संबंध येतो. तुम्ही पक्षाप्रमाणे स्वैर असतात. भविष्य आणि तत्वज्ञान यात तुम्हाला गती असते. विचार तर्कशुद्ध असतात. सर्व साधारण लोकांमध्ये मिसळणे तुम्हाला फारसे आवडत नाही. जीवनात सतत बदल आवडतो. बऱ्याच वेळ तुम्ही विचार मग्न असतात. पुस्तकात रमणे तुम्हाला प्रिय असते. तुम्ही मनाने मोकळे असतात आणि परंपरा स्वीकारतात. इतरांना तुमच्या पासून स्फूर्ती मिळते.
व्यवसाय:- आयात - निर्यात, दुग्ध, मत्स्य, रसायने, वैद्यकीय क्षेत्र.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.
शुभ रंग:- हिरवा, पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 8087520521

.jpg)
Comments
Post a Comment