कोल्हापुरात भरदिवसा तरुणावर गोळीबार ; हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

 

 कोल्हापुरात भरदिवसा तरुणावर गोळीबार ; हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद



कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क 

शहरातील नवीन वाशी नाका येथे गुरुवारी दुपारी भरदिवसा खासगी सावकार व सराईत गुन्हेगार सुरज हनमंत साखरे (३७) याच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दोन गोळ्यांपैकी एक गोळी पोटात लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळीबारानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. त्यांची संपूर्ण हालचाल सीसीटीव्हीत कैद झाली असून करवीर पोलिस, एलसीबी, फॉरेन्सिक आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक व्यवहार व खासगी सावकारीतील वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे कोल्हापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून हल्लेखोरांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

Comments