आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 शुक्रवार, १७ जुलै २०२६




आषाढ शुक्ल तृतीया / सकाळी ६.२८ नंतर चतुर्थी.

वर्षा ऋतू. पराभव नाम संवत्सर.

शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


"दुपारनंतर बहुतेक कामांमध्ये अनुकूलता राहील." आज क्षय तिथी असल्याने महत्त्वाची शुभकामे जाणकारांचा सल्ला घेऊनच करावीत.


🌙 चंद्रनक्षत्र - मघा / (संध्याकाळी ६.३५ नंतर) पूर्वा फाल्गुनी. विनायकी चतुर्थी, करी दिन, गुरू पश्चिम लोप.


🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह.


🔭 चंद्र केंद्र मंगळ, चंद्र युती शुक्र, चंद्र केंद्र हर्षल.


📌 टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.



मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

कामात उत्साह आणि आत्मविश्वास राहील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आर्थिक नियोजन योग्य ठरेल. वरिष्ठांकडून चांगली दाद मिळण्याची शक्यता आहे.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

धनलाभाचे योग आहेत. व्यवसायातील नवीन संधी लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. मन प्रसन्न राहील.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. चंद्र-शुक्र युतीमुळे कला, लेखन आणि सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासाचे योग संभवतात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

चंद्र राशीत असल्याने व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्याल. चंद्र-मंगळ योगामुळे धाडसी पावले यशस्वी ठरतील. भावनांवर नियंत्रण ठेवा.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयम ठेवल्यास लाभ होईल.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

मित्र आणि सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मान-सन्मान वाढेल.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

प्रवास लाभदायक ठरेल. उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत यशाचे संकेत आहेत. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

आर्थिक व्यवहार जपून करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. गुप्त योजना आणि संशोधनात्मक कामात यश मिळेल. संयम ठेवल्यास अडचणी दूर होतील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

वैवाहिक आणि भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नवीन करार फायदेशीर ठरतील. संवादातून गैरसमज दूर होतील.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आरोग्य सुधारेल. नोकरदारांना कामात यश मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि नवीन संधी प्राप्त होतील.


कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 8087520521

Comments