आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 शनिवार, १८ जुलै २०२६




आषाढ शुक्ल पंचमी. वर्षा ऋतू.

पराभव नाम संवत्सर – शके १९४८ – संवत २०८२


🌙 चंद्र – सिंह राशीत

🌟 नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी / (संध्याकाळी ६.०० नंतर) उत्तरा फाल्गुनी


🪔 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 (संपर्क – 8087520521)



१८  जूलै  रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

  

        तुमच्यावर  मंगळ आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. 

         तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती ,करारीपणा व चिकाटी असल्यामुळे कोणत्याही अडचणींवर मात करू शकता. तुम्ही निर्भय व धैर्यवान आहात. वडिलोपार्जित संपत्ती मध्ये तुम्हाला वाटा मिळतो. तुम्ही कष्ट करणारे असून योग्य निर्णय घेता. दुसऱ्यावर हुकूमत गाजवणे आवडते. गतजीवना मध्ये मिळालेल्या मिळालेल्या अनुभवानुसार पुढील जीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही ज्या व्यवसायात असता त्यात पैशाची कमतरता नसते. तुम्ही शिस्तप्रिय असून दुसऱ्याला मदत करायला आवडते. तुमच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे आक्रमकता, प्रतिकार ,धाडस  तडफ ,तत्परता ही तुमची वैशिष्ट्य आहेत. प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा तुम्ही उत्तम तोंड देऊ शकता. तुमच्या बोलण्यात युक्तिवाद किंवा नाजूकपणा नसतो परंतु तुमचा उद्देश मात्र चांगला असतो. शक्यतोवर दुसऱ्यावर टीका करू नये काळजीपूर्वक शब्द वापरावे. तुमच्या स्वभाव तापट व धाडसी आहे. खेळाची व शक्तिशाली व्यायामाची तुम्हाला आवड असते. स्मरणशक्ती उत्तम असून नातेवाईक प्रिय असतात. झटपट पैसा मिळावा अशी अपेक्षा असते. भूतकाळात रमणारे असून कर्तृत्वाबद्दल भरमसाठ कल्पना असतात. पीडितांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते. तुम्ही लहरी व  चमत्कारिक असू शकतात आणि वागण्यात अनिश्चितता असते. तुमच्या मनाची शक्ती प्रबळ असून त्यानुसार तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्ही विचारवंत व अभ्यासू वृत्तीचे आहे असतात. तुमच्या सभोवताली असलेल्या लोकांपेक्षा तुमचे विचार काळाच्या फार पुढे गेलेले असतात. त्यामुळे इतर लोक तुमचा सल्ला घेतात. तुमच्या आवडीनिवडी ठाम असतात. तुमची तत्त्वे तुम्ही सोडत नाहीत. पैशाच्या बाबतीत एक तर तुम्ही नशीबवान असतात. वृत्ती खर्चिक असून आवडत्या व्यक्तीवर खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाही. आपल्या कामाबद्दल ,परिस्थितीबद्दल आणि मिळालेल्या दर्जाबद्दल तुम्ही सुखी व समाधानी असतात. परिस्थितीशी समझोता करणे तुम्हाला आवडते. स्वतःचा नोकरी धंदा करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता.


शुभ दिवस:- सोमवार मंगळवार ,गुरुवार ,शनिवार


शुभ रंग:- तांबडा, पिवळा पांढरा


शुभ रत्न:- पुष्कराज, मोती माणिक.


(रत्ने घेण्यापूर्वी पत्रिका नीट तपासून घ्या)



⏰ राहुकाळ – सकाळी ९.०० ते १०.३०


✨ आज चांगला दिवस आहे.


🔭 ग्रहयोग – रवी लाभ चंद्र, चंद्र लाभ बुध


🔱 विशेष: शनिवार – शनिदेव, कर्म, संयम आणि न्याय यांचा दिवस. नियोजन, प्रलंबित कामे पूर्ण करणे, आर्थिक शिस्त आणि सेवाभाव यासाठी दिवस शुभ राहील.


🐏 मेष (Aries)

आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुलतील. मित्रांच्या सहकार्याने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासामुळे यश मिळेल.

💡 उपाय: हनुमान चालीसाचे पठण करा.


🐂 वृषभ (Taurus)

व्यवसायात चांगली प्रगती होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास लाभ होईल.

💡 उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.


👬 मिथुन (Gemini)

चंद्र-बुध योगामुळे बुद्धिमत्ता आणि संवादकौशल्याचा लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. नवीन योजना यशस्वी ठरतील.

💡 उपाय: श्रीगणेशाला दूर्वा अर्पण करा.


🦀 कर्क (Cancer)

घरातील वातावरण सुखद राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवाल.

💡 उपाय: भगवान शिवाचे नामस्मरण करा.


🦁 सिंह (Leo)

राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. रवी-चंद्र शुभयोगामुळे प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल. महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरतील.

💡 उपाय: सूर्याला अर्घ्य द्या.


🌾 कन्या (Virgo)

नियोजनबद्ध कामामुळे लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे.

💡 उपाय: विष्णू सहस्रनामाचा जप करा.


⚖️ तुळ (Libra)

मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

💡 उपाय: महालक्ष्मीची उपासना करा.


🦂 वृश्चिक (Scorpio)

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.

💡 उपाय: भगवान शिवाला जल अर्पण करा.


🏹 धनु (Sagittarius)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवासातून लाभ होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल.

💡 उपाय: गुरू मंत्राचा जप करा.


🪶 मकर (Capricorn)

आर्थिक व्यवहारात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल.

💡 उपाय: शनिदेवाला तेल अर्पण करा.


🏺 कुंभ (Aquarius)

नवीन संधी लाभदायक ठरतील. दूरच्या व्यक्तींकडून शुभवार्ता मिळेल. संयम आणि नियोजनामुळे यश मिळेल.

💡 उपाय: गरजू व्यक्तींना अन्नदान करा.


🐟 मीन (Pisces)

करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल. मानसिक समाधान आणि आर्थिक लाभाचे योग आहेत.

💡 उपाय: भगवान विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.


– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 8087520521

Comments