आजचे राशीभविष्य
🌞 रविवार, १९ जुलै २०२६
आषाढ शुक्ल षष्ठी. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
१९ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा अंक तुम्हाला जीवनात यश देतो. तुमच्या आयुष्यात काही गुप्त घटना घडतात. जीवनात उपत शत्रूंपासून धोका असतो. तुम्ही प्रेमात उतावळेपणा टाळला पाहिजे. तुम्हाला विविध खेळांची आवड असते. तुमची निरीक्षण शक्ती उत्तम असते. तुम्ही एक उत्तम लेखक होऊ शकतात. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आशावादी असतो. तुमच्या मध्ये आत्मविश्वास असतो आणि तुम्हाला मानसन्मान मिळतात. ठरवलेले उद्दिष्ट तुम्ही आयुष्यात पार पाडू शकतात. इतरांना तुमच्याकडून बरीच मदत होते. मात्र त्याचे श्रेय तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला वारसा हक्काने पैसा किंवा कला उपलब्ध होते. आयुष्याच्या ४६ नंतर भाग्योदय होतो. तुम्ही निर्भयपणे वावरतात. जीवनात कष्ट करण्याचे तुमचे तयारी असते. उत्तम कल्पनाशक्ती तुम्हाला लाभलेली आहे. तुमची प्रकृती अस्थिर आहे आणि तुम्हाला लहरी आणि चमत्कारिकपणा यांचा वारंवार अनुभव येतो. तुम्ही आयुष्यात प्रगती करतात आणि यश संपादन करतात. आयुष्यात बरेचसे चमत्कारिक आणि साहस पूर्ण अनुभव येतात. तुमच्यात जबरदस्त राष्ट्रभक्ती असते आणि घर आणि संसार याकडे तुमचा ओढा असतो. तुम्ही शांत वृत्तीचे असून एकलकोंडे आहात मात्र तरीही तुम्हाला लोकप्रियता मिळते. तुम्ही निस्वार्थी आणि प्रामाणिक असून पैसे जमवण्याकडे तुमचा कल असतो. मात्र पैशांमुळे तुम्हाला सुरक्षित वाटते. तुम्ही धार्मिक आहात. स्वतंत्र वृत्तीचे आहात. जीवनात सतत बदल करण्याची तुमची वृत्ती असते. एकाच गोष्टी तुम्ही फार काळ रमत नाहीत. तुम्ही उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न असतात. तुमचा दृष्टिकोन डोळस असतो. इतरांना सल्ला देणे तुम्हाला आवडते आणि त्यात यश मिळते. तुम्ही व्यवहार दक्ष आणि ध्येयवादी असतात. तुम्हाला कलेबद्दल आकर्षण आहे. आणि तुम्ही त्यात उत्साहाने भाग घेतात. तुमची इच्छा शक्ती चांगली आहे. कोणताही विषय तुम्ही मित्रांना उत्तमपणे समजावून सांगू शकतात. तुम्ही हट्टीपणा टाळला पाहिजे.
व्यवसाय:- तुमचा स्वभाव अस्थिर असल्यामुळे तुम्ही एकाच नोकरीत किंवा व्यवसायात फार काळ टिकत नाहीत. जाहिरात उद्योग, वर्तमानपत्रे, मासिके, चित्रपट उद्योग, नाट्यकला, रंगकाम, अंतर्गत सजावट, नेपथ्य, बँकिंग यात तुम्हाला यश मिळते.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा, सोनेरी, केशरी.
शुभ रत्न:- माणिक, चंद्रमणी.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
⏰ राहुकाळ - सायंकाळी ४.३० ते ६.००
✨ आजचा दिवस चांगला आहे. नियोजन, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णयामुळे बहुतेक कामांत यश मिळेल.
🌙 नक्षत्र - उत्तरा फाल्गुनी / (संध्याकाळी ६.१२ नंतर) हस्त.
🌟 चंद्रराशी - कन्या.
🔭 चंद्र लाभ गुरू, चंद्र त्रिकोण हर्षल, चंद्र प्रतियुती नेपच्यून, मंगळ लाभ शनी.
📌 टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
🐏 मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
भाग्याची साथ लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. प्रवासातून लाभ होऊ शकतो.
🐂 वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील.
👬 मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)
बोलण्यातील प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. नवीन संपर्क लाभदायक ठरतील.
🦀 कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)
नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मन प्रसन्न राहील.
🦁 सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)
धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवास लाभदायक ठरेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.
🌾 कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)
राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र-गुरू शुभयोगामुळे मान-सन्मान वाढेल. महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरतील. नवीन संधींचा लाभ घ्याल.
⚖️ तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
अनावश्यक खर्च टाळा. मानसिक शांतता राखा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयम ठेवल्यास लाभ मिळेल.
🦂 वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)
मित्र आणि सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
🏹 धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. मंगळ-शनी लाभयोगामुळे मेहनतीचे चांगले फळ मिळेल.
🐐 मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)
भाग्याची साथ लाभेल. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल.
🏺 कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)
आर्थिक व्यवहार जपून करा. चंद्र-नेपच्यून प्रभावामुळे भावनिक निर्णय टाळा. संशोधनात्मक कामात यश मिळेल.
🐟 मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)
भागीदारी आणि वैवाहिक जीवनात आनंद राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नवीन करार आणि व्यवहार यशस्वी ठरतील.
📿 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 8087520521

Comments
Post a Comment