आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 मंगळवार, २१ जुलै २०२६



आषाढ शुक्ल अष्टमी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


२१ जूलै  रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

  

        तुमच्यावर गुरु चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. आयुष्यात प्रसिद्धी व मानमरातब उशिरा मिळतात. उत्साह दांडगा असून प्रवासाची आवड असते अतिशय स्वाभिमानी असतात. संशयी वृत्ती असते .प्रकृतीची कुरबुर सतत चालू असते .इतरांची ढवळाढवळ कामात तुम्हाला सहन होत नाही .धारिष्ट्य वान असून कोणत्याही संकटाला तोंड देतात. आपल्या स्वतःच्या घराबद्दल व देशाबद्दल तुम्हाला प्रेम असते. प्रवास करणे ,इतर देशांचा अभ्यास करून स्वतःचे ज्ञान वाढवणे तुम्हाला आवडते. संशोधन करण्याकडे तुमचा अधिक कल असतो .एकाच वेळी खंबीरपणा व भित्रेपणा असे दोन्ही गोष्टी तुमच्या मध्ये अनुभवास येतात .विचारात आणि वागण्यात स्वतंत्रपणा असतो .धर्म याबद्दल स्वतःच्या वेगळ्याच कल्पना असल्याने ठराविक व मान्यवर मार्गाचा अवलंबन करणे तुम्हाला आवडते .स्वतःच्या कर्तुत्वाबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असतो. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला आवडतात .तुम्हाला मोठ्यांनी बोलण्याची सवय असते .कायदे नियम पाळण्यात आवडते खेळ व इतर कलांमध्ये भाग घेण्याची आवड असते .अनेकांशी तुमच्या संपर्क येत असल्याने बराच वेळ लोकांचे कल्याण करण्यात जातो .दुसऱ्यांनी केलेली टीका तुम्ही फार मनाला लावून घेता. आर्थिक बाबतीत सुदैवी असून पैसे मिळवण्यात यशस्वी होता. आयुष्यात अधिकाराची पदे मिळाल्याने पैशाची कमतरता नसते .बौद्धिक कष्टाचे चीज होते. काही वेळा वारसा हक्काने पण पैसा उपलब्ध होतो .तुम्ही परिस्थितीशी समझोता करणाऱ्या व निष्ठावान असतात. तुम्ही चांगल्या माता असून आपल्या मुलांवर व घरावर प्रेम करता. शांतता व आदर याचे तुम्ही प्रतीक असतात .तुम्ही पतीच्या व्यवसायात लुडबुड करीत नाहीत. काही वेळा चमत्कारिक पणा चंचलपणा याचा प्रत्यय येतो. त्यामुळे घरात कटकटीचे वातावरण निर्माण होते.


 शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार शुक्रवार


 शुभ रंग:-

 पिवळा ,जांभळा ,हिरवा आणि अंजिरी


 शुभ रत्ने :- पुष्कराज ,ॲमेथिस्ट. 


-ज्योतिषी मंगश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


⏰ राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


"आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे."


🌙 चंद्रनक्षत्र - चित्रा / रात्री ८.४९ नंतर स्वाती.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या / (सकाळी ७.५५) नंतर तूळ.


🔭 रवी केंद्र चंद्र.

🔭 चंद्र केंद्र गुरू.

🔭 गुरू लाभ हर्षल.


📌 टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


🐏 मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. संध्याकाळी ५ नंतर महत्त्वाचे निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरेल.


🐂 वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आर्थिक व्यवहारात यश मिळेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल.


👬 मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. भागीदारीत लाभ होईल. मित्रांचे सहकार्य लाभदायक ठरेल. संवादकौशल्यामुळे कामे सहज पूर्ण होतील.


🦀 कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

कामाचा ताण कमी होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळनंतर परिस्थिती अधिक अनुकूल राहील.


🦁 सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना यश मिळेल. सर्जनशील कामात प्रगती होईल. प्रेमसंबंधात सकारात्मक वातावरण राहील.


🌾 कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

सकाळपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर नवीन नियोजनासाठी वेळ अनुकूल राहील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आत्मविश्वास वाढेल.


⚖️ तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

सकाळी ७.५५ नंतर चंद्र राशीत येत असल्याने व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस अनुकूल आहे. लोकांचे सहकार्य लाभेल. संध्याकाळनंतर शुभ वार्ता मिळू शकते.


🦂 वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ घालवाल. नवीन खरेदीचा योग संभवतो.


🏹 धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळनंतर शुभ बातमी मिळेल.


🐐 मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांची कृपा राहील. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मेहनतीचे समाधानकारक फळ मिळेल.


🏺 कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. गुरुच्या कृपेने नवीन संधी प्राप्त होतील.


🐟 मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. संध्याकाळनंतर मानसिक समाधान मिळेल.


📿 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 8087520521



-ज्योतिषी मंगेश  पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments