आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 बुधवार, २२ जुलै २०२६




आषाढ शुक्ल नवमी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


२२ जूलै  रोजी जन्मलेल्या व्यक्तीची  वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

  

        तुमच्यावर हर्षल आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या आयुष्यात मोठ्या जबाबदारीची कामे मिळतात. कौटुंबिक जीवन सुखाचे असते.  मित्र परिवारा अतिशय छोटा असतो. भांडण्याची फिकीर करीत नाही. भावनेची काटकसर करता. बऱ्याच वेळा एकटेपणा जाणवतो .आयुष्यातील ४० ते ६० वर्ष महत्त्वाचे असून यशाचा सर्वोच्च काळ असतो. परलिंगी व्यक्ती पासून फायदा होतो. हर्षल व मंगळ या ग्रहांच्या मुळे बऱ्याच वेळा तुमच्या जीवनात विरोधाभास असतो. हर्षल हा स्फोटक ग्रह असल्यामुळे जीवनात बरेच चढउतार होण्याची शक्यता असते. अनपेक्षित गोष्टी, विलक्षण गोष्टी होतात. कर्तुत्व असूनही विलक्षण घटना घडतात. व्यवसायात अनेक बदल होतात ,त्यामुळे अस्थिरता अस्वस्थता निर्माण होते. उत्साह, प्रगती ,जोम ही तुमची वैशिष्ट्ये आहेत तुमची मनाची पातळी खूप उच्च दर्जाची असते. मानवाच्या कल्याणासाठी बुद्धीचा व कृतीचा उपयोग करतात .तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. तुम्हला खोटेपणा आवडत नाही. तुमचा स्वभाव परखड असून दुसऱ्याचे विचार तुम्हाला सहजा सहजी पटत नाही. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे इतर लोक दुखावले जातात व निष्कारण गैरसमज व शत्रुत्व निर्माण होते. तुमच्या कामात कोणाची ढवळाढवळ तुम्हाला आवडत नाही, जर अशी ढवळढवळ कोणी केली तर तुम्ही तुमचे काम सोडून बाहेर पडतात. डोके शांत ठेवून काम केल्यास आयुष्यात यश मिळते. पण हट्टीपणा आणि उद्धटपणा यामुळे अडचणी येतात. वृत्तीने निर्भीड असून कोणत्याही धोकेस तोंड देण्यात तुम्ही तयार असतात. जीवनात सतत बदल असावा असे तुम्हाला वाटते. घरातील व कौटुंबिक संबंधातून व नातेवाईकांपासून तुम्हाला त्रास होतो. आयुष्यात अनेक अडचणी आणि विलंब असूनही पैशाच्या बाबतीत तुम्ही समाधानी असतात. तुम्ही तल्लख व आकर्षक आहात. तीव्र इच्छाशक्ती असून नीटनेटकेपणा चांगल्या कपड्यांचे शौकिन असतात. घरातील सजावट उत्तम असावी असे तुम्हाला वाटते. बऱ्याच वेळा स्वतःचा वरचढपणा दाखवण्याची लहर येते. काही वेळा चमत्कारिक स्वभावामुळे सबंध दिवस खराब जातो. एक किंवा दोन भाग्यांक असलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात राहणे फायदेशीर ठरते .


शुभ दिवस:- रविवार ,सोमवार शुक्रवार, शनिवार 


शुभ रंग:- पांढरा, निळा, गुलाबी 


शुभ रत्न:- हिरा,मोती, पोवळे


(रत्ने घेण्यापूर्वी पत्रिका नीट तपासून घ्या)

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


⏰ राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


"आज वर्ज्य दिवस असून वृद्धी तिथी आहे."


🌙 नक्षत्र - स्वाती.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - तूळ.


🔭 चंद्र त्रिकोण बुध.

🔭 चंद्र लाभ शुक्र.


📌 टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


🐏 मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

कामात उत्साह राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना तयार करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.


🐂 वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आर्थिक व्यवहारात संयम बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. नियोजनबद्ध कामातून यश मिळेल.


👬 मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

चंद्र-बुध त्रिकोण योगामुळे बुद्धिमत्ता आणि संवादकौशल्याचा लाभ होईल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.


🦀 कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.


🦁 सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.


🌾 कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. संशोधन व अभ्यासात प्रगती होईल. संयम आणि चिकाटी लाभदायक ठरेल.


⚖️ तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र-शुक्र लाभ योगामुळे आर्थिक लाभाचे संकेत आहेत. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.


🦂 वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. मानसिक शांतता लाभेल.


🏹 धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी पडतील.


🐐 मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

व्यवसाय आणि नोकरीत चांगली प्रगती होईल. वरिष्ठांची कृपा लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. अपेक्षित यश मिळेल.


🏺 कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. शिक्षण, स्पर्धा आणि प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.


🐟 मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

कामाचा व्याप वाढेल, पण मेहनतीचे योग्य फळ मिळेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. संयम आणि शिस्त लाभदायक ठरेल.


📿 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 8087520521

Comments