आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 गुरुवार, २३ जुलै २०२६




आषाढ शुक्ल नवमी / सकाळी ७.०४ नंतर दशमी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


२३ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:- 


     तुमच्यावर बुध, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला जीवनात यश मिळते व मानमरातब आणि संपत्ती याचा लाभ होतो. स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे तुम्हाला आवडते. भिन्नलिंगी व्यक्तीमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. तुम्ही प्रेमळ असून स्वातंत्र्याचे भोक्ते आहात. तुमच्याजवळ चांगले शब्द भंडार आहे त्यामुळे लेखन भाषण देणे आणि शिकवणे याच्यात तुम्ही यशस्वी होतात. तुम्हाला सर्व गोष्टी झटपट केलेल्या आवडतात. इतरांच्या बाबत व परिस्थितीबाबत तुम्ही अतिशय संवेदनशील असून परिस्थितीचा ही तुमच्यावर फार मोठा परिणाम होतो. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगण्याची तुम्हाला आवड असते. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याची पूर्व नियोजित योजना तुम्ही तयार करतात. बौद्धिक गोष्टींचे तुम्हाला विलक्षण आकर्षण असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असून तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. नाविन्य आणि प्रवासाची आवड ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. जे पीडित लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते. तुमची स्मरणशक्ती चांगली असून आप्त जन तुम्हाला प्रिय असतात. विरुद्ध बाजूच्या व्यक्तीची क्षमता तुम्ही जाणू शकतात त्यामुळे त्याच्यातील न्यूनतेचा फायदा तुम्ही उठवू शकतात. तुमच्यात भाषा चातुर्य असते. तुम्ही मनाने कमकुवत असल्याने अस्वस्थ असतात. तुम्हाला आपल्या आवाजाची देणगी असते. तुमची बहुतेक सुखे मानसिक पातळीवर असतात आणि त्यांना व्यावहारिक पातळीवर आणण्याचा तुमचा दृष्टिकोन असतो. सहकार्य आणि समाजप्रियता ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुमच्या शब्दात आणि कृतीत ठामपणे असतो. दुसऱ्याला न दुखावण्याचा स्वभाव तुमचा असतो. आणि तुम्ही सहकार्य करतात. फारशी बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. स्त्रियांमध्ये सुखी वैवाहिक जीवन दर्शवते. लहान वयात एखादे प्रेम प्रकरण असू शकते. तुम्ही कृतिशील असून तुमच्यात भाषण चातुर्य आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला जुगारी वृत्ती किंवा कोडे सोडवण्याचा छंद असू शकतो. 


शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पांढरा, हिरवा.


शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


⏰ राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज वर्ज्य दिवस आहे."


🌙 चंद्र नक्षत्र - विशाखा.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - तूळ / संध्याकाळी ७.०१ नंतर वृश्चिक.


🔭 शुक्र षडाष्टक शनी.


📌 टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


🐏 मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा.


🐂 वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.


👬 मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

भागीदारीच्या कामात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन संपर्क भविष्यात उपयोगी ठरतील. संवादकौशल्यामुळे कामे मार्गी लागतील.


🦀 कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

कामाचा व्याप वाढेल, पण मेहनतीचे चांगले फळ मिळेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमितपणा लाभदायक ठरेल.


🦁 सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

विद्यार्थी आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात मधुरता राहील.


🌾 कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. मानसिक समाधान लाभेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल.


⚖️ तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

संध्याकाळपर्यंत राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. संध्याकाळनंतर भावनांवर नियंत्रण ठेवा.


🦂 वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

संध्याकाळी ७.०१ नंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह वाढेल. नवीन योजना आखण्यासाठी वेळ अनुकूल राहील. आत्मविश्वासामुळे कामात यश मिळेल.


🏹 धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.


🐐 मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.


🏺 कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

भाग्याची साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.


🐟 मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

आर्थिक व्यवहारात यश मिळेल. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. संयमाने वागल्यास दिवस समाधानकारक जाईल.


📿 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 8087520521

Comments