आजचे राशिभविष्य
🌞 शुक्रवार, २४ जुलै २०२६
आषाढ शुक्ल दशमी / सकाळी ९.१३ नंतर एकादशी.
ग्रीष्म ऋतू. पराभव नाम संवत्सर.
शके १९४८, संवत २०८२.
२४ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन यात तुम्ही अंतर ठेवतात. गरीब, अपंग व्यक्तीसाठी तुम्ही संस्था काढतात किंव आर्थिक मदत करतात. तुमचा स्वभाव अस्थिर असू शकतो आई वागण्यात विरोधाभास असू शकतो. तुमचा विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो आणि लग्नानंतर भाग्योदय होतो. तुम्हाला शिकणे आणि शिकवणे आवडते.
तुम्ही दिसायला शांत असले तरी कधीही तडजोड करत नाहीत. तुम्ही अति महत्वाच्या पदांवर यशस्वी होतात. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी असतो. तुम्ही अनाठायी काळजी करतात.घर, संसार मित्र यांचा बद्दल आपुलकीची नाती जोडली जातात. भाषणे, लेखन, रेडिओ कार्यक्रम यात तुम्ही रस घेतात.
तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुमचा सहवास नेहमीच उत्साह वर्धक असतो. तुम्हाला गायन, नृत्य किंवा इतर कलांची तसेच गूढ विद्यांची आवड असते. आईबद्दल विशेष प्रेम असते तर आई कडील नातेवाईकांशी तुमचे विशेष पटते. तुम्हाला सामाजिक रूढी आणि परंपरा फारशा आवडत नाहीत. तुमची ही तारीख सौंदर्य, आरोग्य, सामर्थ्य, प्रेम, आकर्षण, आपुलकी दर्शवते. स्वभाव खर्चिक असतो. तुम्ही भावनाप्रधान आहात. तुम्हाला वारसा हक्काने किंवा विवाहाच्या निमित्ताने पैसे मिळतो. तुम्ही खर्चिक छंद जोपासतात. श्रीमंती आणि खर्च यांचा ताळमेळ तुम्ही व्यवस्थित घालतात. अचानक धनलाभ होणायची शक्यता असते. ज्याचे आकर्षण वाटते त्यावर पैसे खर्च करण्यास तुम्ही मागे पुढे बघत नाहीत.
व्यवसाय:- जमीन खरेदी विक्री, एजंट, शेअर ब्रोकर, आर्किटेक्ट, हॉटेल मॅनेजर, मिठाई, संगीत.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
⏰ राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आजचा शुभ कालावधी :-
सकाळी १०.२८ ते ११.३४ - नोकरी, व्यापार, शुभ कार्य कारण्यासाठ अनुकूल
सकाळी ११.३४ ते दुपारी १२.४० - जमीन, कृषी, क्रीडा, वादविवाद, कोर्ट यासाठी शुभ.
दुपारी १२.४० ते दुपारी १.४६ - राजकारण, शासकीय व्यवहार, न्यायालय, धाडसी निर्णय यासाठी शुभ.
दुपारी १.४६ ते दुपारी २.५१ - प्रेम, दागिने खरेदी, कला यासाठी शुभ.
दुपारी २.५१ ते दुपारी ३.५७ - गणित, वाचन, लेखन, ज्योतिष, व्यापार, दळणवळण यासाठी शुभ.
दुपारी ३.५७ ते संध्याकाळी ५.०३ - प्रणय, नृत्य, घराची सुंदरता, जलप्रवास, दागिने यांसाठी शुभ.
संध्याकाळी ५.०३ ते संध्याकाळी ६.०९ - कष्ट, धातूखरेदी, तेल, नोकर चाकर, दानधर्म यासाठी शुभ.
संध्याकाळी ६.०९ ते संध्याकाळी ७.१४ - बँकिंग, हिशोब, शुभ कार्य बोलणी, धार्मिक कामे, वाणिज्य, व्यापार यांसाठी शुभ.
"आज उत्तम दिवस आहे."
🌙 चंद्रनक्षत्र - अनुराधा.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.
🔭 रवी त्रिकोण चंद्र.
🔭 चंद्र त्रिकोण गुरू.
🔭 चंद्र प्रतियुती हर्षल.
🔭 चंद्र त्रिकोण नेपच्यून.
🔭 बुध लाभ शुक्र.
📌 टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
घरगुती वातावरण आनंददायी राहील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. स्थावर विषयांमध्ये प्रगती होईल. महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.
वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवादकौशल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. लहान प्रवास लाभदायक ठरेल.
मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
आर्थिक लाभाचे उत्तम योग आहेत. बुध-शुक्र लाभ योगामुळे व्यापार आणि व्यवहारात यश मिळेल. नवीन खरेदीचा योग संभवतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आत्मविश्वासाच्या जोरावर महत्त्वाची कामे पूर्ण कराल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांची कृपा लाभेल.
सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
अनावश्यक खर्च टाळा. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या व्यक्तींकडून शुभवार्ता मिळेल. संयम लाभदायक ठरेल.
कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक वाढेल. नवीन संपर्क भविष्यात लाभदायक ठरतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.
तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. बुध-शुक्र योगामुळे कला, लेखन आणि सर्जनशील क्षेत्रात विशेष यश मिळेल.
वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. रवी-चंद्र व गुरु-चंद्र त्रिकोण योगामुळे महत्त्वाच्या कामात यश मिळेल. चंद्र-हर्षल प्रतियुतीमुळे घाईघाईने निर्णय घेणे टाळा. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.
धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
खर्चावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. गुप्त विषयांचा अभ्यास लाभदायक ठरेल. संयमाने वागल्यास दिवस समाधानकारक जाईल.
मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील.
कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. प्रतिष्ठा वाढेल.
मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवास लाभदायक ठरेल. गुरुच्या कृपेने नवीन संधी प्राप्त होतील.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 8087520521

Comments
Post a Comment