रोटरी क्लब ऑफ गार्गीजचा १९ वा पदग्रहण सोहळा संपन्न.
कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क
रोटरी क्लब ऑफ गार्गीजचा १९ वा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट ३१७० चे इन्स्टॉलिंग ऑफिसर पीडीजी रो. नासिर बोरसदवाला यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या क्लबच्या एजी रो. अरुंधती महाडिक आहेत.यावेळी मावळत्या प्रेसिडेंट रो. अंजली मोहिते यांनी क्लबच्या कार्याचा आढावा घेतला, तर मागील वर्षीच्या सेक्रेटरी रो. सविता पदे यांनी अहवाल वाचन केले आणि कार्यकारिणीने केलेल्या कामाविषयी सविस्तर विवेचन केले.
यानंतर रो. नासिर बोरसदवाला यांच्या उपस्थितीत २०२६-२७ साठी रो. सविता पदे यांनी प्रेसिडेंटपदाचा, रो. सीमा मालानी यांनी सेक्रेटरी पदाचा व रो. हर्षदा नाईक यांनी ट्रेझरर पदाचा कार्यभार स्वीकारला. रो. सविता पदे यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी बोलताना रो. नासिर बोरसदवाला यांनी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने २०२५-२६ या कालावधीत केलेल्या कामकाजाबाबत मावळत्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले. खास करून यावेळी त्यांनी यामिनी प्रदर्शन उत्कृष्ट भरविले आणि पर्यावरणाचे महत्त्व शिवाय शालेय विद्यार्थिनीला सर्वांगीण मार्गदर्शन यावर गार्गीज क्लबने केलेल्या कामाचा विशेष उल्लेख केला, आणि २०२६ - २७ या नव्या कार्यकारिणीला चांगले काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पीडीजी रो. प्रताप पुराणिक, पीडीजी रो. संग्राम पाटील, पीडीजी रो. श्रीनिवास मालू, ऐजी रो. हर्षवर्धन तायवाडे पाटील, रो. विक्रांतसिंह कदम, रो. सुहास जोशी, रो. अमित माटे,रो. अमरदीप पाटील, रो.प्रसन्न देशिंगकर व ऐजी रो. दीपिका मर्दा यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सूत्रसंचालन रो. मधुलिका जगदाळे, रो. दुर्गा भिंगार्डे, रो. जया माहेश्वरी व रो. सुजाता लोहिया यांनी केले. तर आभार रो. सीमा मालानी यांनी मानले.
मावळत्या ट्रेझरर रो. हेमलता कोटकर यांच्यासह रो. शोभा तावडे, रो. कल्पना घाटगे, रो. बीना जनवाडकर, रो. साधना घाटगे, रो. विशाखा आपटे, रो. गौरी शिरगावकर रो. लक्ष्मी शिरगावकर, रो. मेघना शेळके, रो. गायत्री मेनन, रो. सुरेखा इंग्रोळे, रो. प्रिया आरगे, रो. सुप्रिया डोईजड, रो. गीता पाटील, रो. दीपिका कुंभोजकर, रो. आशा जैन, रो. ममता झंवर, रो. योगिनी कुलकर्णी, रो. अर्चना देशपांडे, रो. उन्नती सबनीस, रो. रेश्मा शहा, रो. रेखा सारडा, रो. शीतल मुथा, रो. मंजिरी मोरे, रो. रुपाली मिरजे, रो. शीतल लवटे, रो. नंदिनी पटोडिया, रो. प्रीती मेनन, रो.सविता उपाध्ये इत्यादी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या सदस्या व रोटरी मूव्हमेंट चे सर्व प्रेसिडेंट व सेक्रेटरी उपस्थित होते.

.jpg)
Comments
Post a Comment