आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 रविवार, २६ जुलै २०२६



आषाढ शुक्ल द्वादशी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - सायंकाळी ४.३० ते ६.००


✨ आज चांगला दिवस आहे.

🪔 आज प्रदोष व वामन पूजन आहे.


🌙 नक्षत्र - ज्येष्ठ / सकाळी ७.३५ नंतर मूळ.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक / सकाळी ७.३५ नंतर धनु.


🔭 रवी षडाष्टक चंद्र.

🔭 चंद्र केंद्र नेपच्यून.


📌 टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


🐏 मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.


🐂 वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आर्थिक व्यवहारात लाभ होईल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. नियोजनबद्ध कामातून यश मिळेल. संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.


👬 मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

नवीन कल्पनांना योग्य दिशा मिळेल. विद्यार्थ्यांना आणि बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. संवादातून लाभ होईल.


🦀 कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

कार्यक्षेत्रात प्रगती होईल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.


🦁 सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.


🌾 कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

घरगुती वातावरण सुखद राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. मानसिक समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.


⚖️ तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवास लाभदायक ठरेल. महत्त्वाच्या चर्चेत यश मिळेल.


🦂 वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

सकाळी ७.३५ पर्यंत राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. रवी-चंद्र षडाष्टकामुळे भावनिक निर्णय टाळा. संयम लाभदायक ठरेल.


🏹 धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

सकाळी ७.३५ नंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. नवीन योजनांची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.


🐐 मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

खर्चावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या व्यक्तींकडून शुभवार्ता मिळू शकते. संयम लाभदायक ठरेल.


🏺 कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगतीची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन योजना यशस्वी ठरतील.


🐟 मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. चंद्र-नेपच्यून केंद्र योगामुळे कल्पकता वाढेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.


📿 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 8087520521

Comments