आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 🌞 सोमवार, २७ जुलै २०२६





आषाढ शुक्ल त्रयोदशी / (दुपारी ४.१५ नंतर) चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


🌙 चंद्र नक्षत्र - मूळ / (सकाळी १०.२९ नंतर) पूर्वाषाढा.

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु.


✨ आज वर्ज्य दिवस आहे.


🔭 रवी लाभ हर्षल.

🔭 रवी त्रिकोण नेपच्यून.

🔭 चंद्र प्रतियुती बुध.

🔭 चंद्र केंद्र शनी.


📌 टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


🐏 मेष:-

भाग्याची साथ लाभेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रवासाचे नियोजन यशस्वी होईल. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.


🐂 वृषभ:-

आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळा. संयम आणि नियोजनामुळे यश मिळेल.


👬 मिथुन:-

चंद्र-बुध प्रतियुतीमुळे बोलताना गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. महत्त्वाच्या चर्चा विचारपूर्वक करा. विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल.


🦀 कर्क:-

कामाचा ताण वाढू शकतो, पण वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नियमितपणा आणि शिस्त ठेवल्यास कामे पूर्ण होतील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.


🦁 सिंह:-

संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. सर्जनशील क्षेत्रात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आत्मविश्वास कायम राहील.


🌾 कन्या:-

घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. मानसिक समाधान लाभेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल.


⚖️ तुळ:-

पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवादकौशल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. लहान प्रवासाचे योग संभवतात.


🦂 वृश्चिक:-

आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होतील. गुंतवणूक विचारपूर्वक करा.


🏹 धनु:-

राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. रवी-हर्षल व रवी-नेपच्यून शुभ योगामुळे नवीन कल्पनांना यश मिळेल. चंद्र-शनी केंद्र योगामुळे संयम ठेवल्यास मोठे यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.


🐐 मकर:-

खर्चावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. जुनी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. संयम लाभदायक ठरेल.


🏺 कुंभ:-

मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नियोजनबद्ध कामातून यश मिळेल.


🐟 मीन:-

व्यवसाय व नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कल्पकतेचा योग्य उपयोग केल्यास विशेष यश मिळेल. मानसिक स्थैर्य राखा.


📿 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 8087520521

Comments