कोल्हापुरात अल्ट्राव्हायोलेटचे नवे एक्सपीरियन्स सेंटर सुरू; प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकली आता शहरात उपलब्ध
कोल्हापुरात अल्ट्राव्हायोलेटचे नवे एक्सपीरियन्स सेंटर सुरू; प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकली आता शहरात उपलब्ध
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
भारतातील प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्हने कोल्हापुरात आपल्या नव्या एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन करून महाराष्ट्रातील विस्ताराला आणखी गती दिली आहे. या शोरूममधून कंपनीच्या F77 आणि X-47 या अत्याधुनिक इलेक्ट्रिक मोटरसायकलींची विक्री, टेस्ट रायड तसेच विक्रीनंतरची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्हचे सह-संस्थापक नारायण सुब्रमण्यम आणि नीरज राजमोहन यांनी कंपनीच्या विस्ताराबाबत सांगितले की, कोल्हापूरसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात आधुनिक इलेक्ट्रिक मोबिलिटी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे एक्सपीरियन्स सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल. ग्राहकांना जागतिक दर्जाचा रायडिंग अनुभव, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट विक्रीनंतरची सेवा देण्यावर कंपनीचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटनानिमित्त कंपनीने 'Kill the Petrol Bill' ही विशेष योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत F77 किंवा X-47 खरेदी करणाऱ्या पात्र ग्राहकांना त्यांच्या मागील दुचाकीच्या वापराच्या आधारे ₹30 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळू शकणार आहे.
कोल्हापुरातील हे एक्सपीरियन्स सेंटर CTS No. 453, B/6, द फर्न हॉटेल शेजारी, स्टेशन रोड, श्री शाहू मार्केट यार्डसमोर, कोल्हापूर येथे सुरू करण्यात आले असून, येथे टेस्ट रायड, फायनान्स सुविधा आणि सर्व्हिसिंगची सुविधा उपलब्ध आहे.
ही नवीन सुरुवात कोल्हापूर आणि परिसरातील ग्राहकांसाठी अत्याधुनिक, पर्यावरणपूरक आणि उच्च-कार्यक्षम इलेक्ट्रिक मोटरसायकली सहज उपलब्ध करून देणारी ठरणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.


Comments
Post a Comment