बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या बंद योजनांना पूर्ववत सुरू करण्याची रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनची मागणी

 बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या बंद योजनांना पूर्ववत सुरू करण्याची रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनची मागणी



कोल्हापूर १३ सिटी न्यूज नेटवर्क 

 महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, तसेच कामगारांना त्यांचा लाभ तातडीने मिळावा, अशी मागणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन (RPI FE), कोल्हापूर शाखेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त, कोल्हापूर यांच्याकडे 

राज्य संघटन सचिव (RPI) प्रा. शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.


निवेदनात नवविवाह अनुदान, सिंधुदुर्ग, शैक्षणिक आणि वैद्यकीय योजनांसह बांधकाम कामगारांसाठी बंद करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना तात्काळ पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शासनाने कामगार हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना कोणताही विलंब न लावता लाभ द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.


यावेळी  जिल्हाध्यक्ष डॉ. किशोर सडोलीकर, जिल्हा सचिव  रुपेश आठवले , कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, सचिव सतीश माळगे, उपाध्यक्ष संजय जिरगे, जिल्हा संघटक बटू भामटेकर, विनोद कुरणे, हरी कांबळे, मल्लिक चिकदूळ, विजय पंडत आदी उपस्थित होते.

Comments