खाशाबांचा ७४ वा पदकदिन क्रीडा प्रबोधनाने साजरा



खाशाबांचा ७४  वा पदकदिन क्रीडा प्रबोधनाने साजरा

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खाशाबांच्या पोस्टरचे प्रकाशन

– खाशाबांचे पोस्‍टर प्रकाशित करताना बाळ पाटणकर, तेजस्वीनी सावंत, लेखक, प्रा. संजय दुधाणे, शिवाजी साळुंखे , रवींद्र पाटील , अवधूत साळुंखे, धैयशील पुंगावकर



कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क 

  राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानच्‍या वतीने कोल्हापूरात प्रथमच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा 74 वा पदकदिन उत्‍साहात साजरा करण्यात आला. क्रीडा चर्चासत्राव्‍दारे खाशाबांना ऐतिहासिक कामगिरीला यावेळी मानवंदना देण्यात आली. 

कोल्हापूरतील श्री दत्त स्पोर्ट्स संकुलामध्ये  खाशाबा पुन्हा कोल्हापूरात घडण्यासाठी योजना व संकल्प या विषयावर चर्चासत्राने  क्रीडामय वातावरणात पदकदिन साजरा झाला. याप्रसंगी क्रीडा प्रतिष्ठाचे अध्यक्ष बाळ पाटणकर, ऑलिम्पिकपटू नेमबाज श्रीमती तेजस्वीनी सावंत, लेखक, क्रीडा अभ्यासक प्रा. संजय दुधाणे, राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी साळुंखे व कुस्‍ती संघटक रवींद्र पाटील , अवधूत साळुंखे, धैयशील पुंगावकर, प्रतिक साळुंखे आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. 



स्वतंत्र भारतासाठी 23 जुलै 1952 रोजी खाशाबा जाधव यांनी कुस्तीत पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. खाशाबांनी जिंकलेल्या पदकाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष असल्याने त्‍यांच्‍या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी विशेष पोस्‍टर याप्रसंगी प्रकाशित करण्यात आले. कोल्‍हापूरातील तालमी व शाळांना खाशाबा जाधवांचे ७५ पोस्टर लेखक संजय दुधाणे यांच्या वतीने भेट देण्यात आली. 

कोल्‍हापुर ही क्रीडारत्‍नाची खाण असून येत्‍या काळात अनेक खाशाबा या मातीत घडतील असे सांगून बाळ पाटणकर म्‍हणाले की, प्रतिकूल परिस्‍थितीवर मात करू खाशाबांनी ऑलिम्‍पिक जिंकण्याचा पराक्रम केला. आता अत्‍याधुनिक सुविधा प्राप्‍त झाल्‍यास अनेक आंतरराष्ट्रीय कोल्‍हापूरातून घडतीत. कोल्‍हापूरातील क्रीडाविश्वाला कार्पेरट मदत प्राप्‍त झाली तर मोठे पाठबळ निर्माण होईल, त्‍यासाठी सामूहिक प्रयत्‍न गरजेचे आहे. 

महाराष्ट्र शासनाच्‍या पाठबळ, आई व गुरूंजणाचे आशिर्वादामुळे मी जागतिक यश संपादन केले असे सांगून ऑलिम्पिकपटू तेजस्वीनी सावंत म्‍हणाल्‍या की कोल्‍हापूरात आधुनिक सुविधांस. मोठे व्‍यासपीठ उपलब्ध झाले असल्‍याने केवळ जिल्‍हास्‍तरीय यशावर समाधान न मानता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यशासाठी सातत्‍याने सराव केला पाहिजे. 

ऑलिम्‍पिक स्‍पर्धेत कराडच्‍या खाशाबा जाधव यांनी ४ लढती जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या खाशाबांच्‍या अभूतपर्व कामगिरीला उजाळा लेखक संजय दुधाणे यांनी दिला. 


Comments