आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये जिओ नेटवर्कचे मजबुतीकरण

 आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये जिओ नेटवर्कचे मजबुतीकरण



वाखरी आणि पालखी मार्गावरही सक्षम व विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी


पंढरपूर २१ सिटी न्यूज नेटवर्क 

 आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेटवर्क असलेल्या रिलायन्स जिओने पंढरपूर शहरासह प्रमुख पालखी मार्गांवरील आपले नेटवर्क अधिक सक्षम केले आहे. यामुळे आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना अखंड, वेगवान आणि विश्वासार्ह कनेक्टिव्हिटीचा अनुभव मिळणार आहे.


पंढरपूर हे महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकरी भगवान श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. शतकानुशतके सुरू असलेली पायी वारीची परंपरा ही महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक मानली जाते.


पुणे ते पंढरपूर या सुमारे २४० किलोमीटरच्या संपूर्ण मार्गावर जिओने १०० टक्के 4G आणि सुमारे ९५ टक्के 5G नेटवर्क कव्हरेज उपलब्ध करून दिले आहे.


पंढरपूर शहर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर तसेच रेल्वे स्थानक या महत्त्वाच्या ठिकाणी जिओने नेटवर्क क्षमता अधिक वाढवली आहे. तसेच पालखी मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आणि ऐतिहासिक रिंगण सोहळ्याचे स्थळ असलेल्या वाखरी येथेही नेटवर्क अधिक सक्षम करण्यात आले आहे.


या उपक्रमाचा भाग म्हणून जिओने तीन Coverage on Wheels (COW) मोबाईल नेटवर्क टॉवर्स तैनात केले असून, त्यामुळे अतिरिक्त नेटवर्क क्षमता उपलब्ध होऊन भाविक आणि पर्यटकांना अधिक दर्जेदार कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.


रिलायन्स जिओच्या नेटवर्क पथकाने युद्धपातळीवर काम करून आषाढी वारीपूर्वीच नेटवर्क उन्नतीकरणाचे सर्व काम निर्धारित वेळेत पूर्ण केले आहे.


याशिवाय, जिओच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर पोलिस प्रशासनाची भेट घेऊन आषाढी वारीदरम्यान करण्यात आलेल्या नेटवर्क व्यवस्था आणि वाढीव कनेक्टिव्हिटीबाबत माहिती दिली.


यावेळी पोलिस प्रशासनाने आषाढी वारीदरम्यान सक्षम नेटवर्क सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल रिलायन्स जिओचे कौतुक करत सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Comments