बारामती मध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम, प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत वारकर्‍यांना खाऊ वाटप आणि वैद्यकीय मदत


  बारामती मध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम, प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत वारकर्‍यांना खाऊ वाटप आणि वैद्यकीय मदत


बारामती १६ सिटी न्यूज नेटवर्क 

संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त बारामती येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वारकर्‍यांसाठी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी उपस्थित राहून वारकर्‍यांसमवेत विठ्ठल नामाचा गजर करत पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला.

  संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त बारामती येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वारकर्‍यांसाठी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी उपस्थित राहून वारकर्‍यांसमवेत विठ्ठल नामाचा गजर करत पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वारकर्‍यांचे स्वागत करत त्यांना खाऊचे वाटप केले. हजारो वारकर्‍यांची सेवा करण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून, वारकरी संप्रदायातील सेवाभावाची परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वैद्यकीय सहायता कक्ष  उभारण्यात आला होता. या कक्षाद्वारे वारकर्‍यांना प्राथमिक आरोग्य सेवा, आवश्यक औषधे तसेच वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. पालखी मार्गावरील वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम विशेषत्वाने राबविण्यात आला. या सेवा उपक्रमाला वारकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजसेवा, मानवता आणि वारकरी परंपरेतील निस्वार्थ सेवाभाव जपण्याचा संदेश भारतीय जनता युवा मोर्चाच्या या उपक्रमातून देण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलवनकर, भाजपा युवा नेते सचिन जायभाई पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments