महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान यांचा जातीचा दाखला वैध; जिल्हा पडताळणी समितीचा निर्णय
कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. कौसर इस्माईल (मौल्ला) बागवान यांचा जातीचा दाखला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर यांनी वैध ठरविला आहे. समितीने आवश्यक कागदपत्रे, वंशावळीचे पुरावे तसेच संबंधित नोंदींची सखोल छाननी केल्यानंतर 'बागवान' (OBC-182) या प्रवर्गातील त्यांचा जातीचा दावा ग्राह्य धरला.
समितीच्या निर्णयानुसार 8 जुलै 2026 रोजी त्यांना जातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या जातीच्या दाखल्याबाबत सुरू असलेली पडताळणी प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण झाली आहे.
सक्षम प्राधिकरणाने सर्व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्यांच्या जातीच्या दाव्याला वैधता दिल्याने संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून, या निर्णयाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

Comments
Post a Comment