काकीजींच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम; विद्यार्थिनींना गणवेश वाटप व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

 काकीजींच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम; विद्यार्थिनींना गणवेश वाटप व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात



कोल्हापूर  २० सिटी न्यूज नेटवर्क 

काकीजींच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त सौ. सरोजिनी देवी विश्वनाथ विश्वस्त मंडळ आणि स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.


यावेळी सौ. सरोजिनी देवी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे उषाराजे हायस्कूलमधील इयत्ता ५ वी ते ९ वीतील एकूण ७५ विद्यार्थिनींना शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.


तसेच स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेतर्फे एकल महिला पालकांसाठी जिल्हास्तरीय 'सरोज चषक' वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्हाभरातील १६ स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या प्रभावी वक्तृत्व कौशल्याचे दर्शन घडविले.


स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले –


- प्रथम क्रमांक : प्रिया पिंटू जाधव (गारगोटी) – सरोज चषक व रु. ३,००० रोख

- द्वितीय क्रमांक : महादेवी आप्पासाहेब मगदूम (कोल्हापूर) – ट्रॉफी व रु. २,५०० रोख

- तृतीय क्रमांक : ज्योत्स्ना सुहास कसाळकर – ट्रॉफी व रु. २,००० रोख


स्पर्धेतील रोख पारितोषिकांचे प्रायोजकत्व कै. नलिनी माधवराव देशपांडे कुटुंबीय (आजरा) यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण मा. राजेंद्र दिनानाथ कांडगावकर आणि डॉ. प्रियदर्शनी उमेश चोरगे यांनी केले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या तज्ञ संचालिका अंजली घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. नीता दटमजगे यांनी काकीजींच्या कार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन शीतल व्हटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वयंप्रेरिकेच्या अध्यक्षा जागृती लिगाडे यांनी मानले.


यावेळी स्वयंसिद्धा कार्यकारी संचालिका जयश्री गायकवाड, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्यां तिरोडकर, स्वयंप्रेरिकेच्या सचिव कविता बड्डे, संस्थेच्या सर्व संचालिका, कार्यकर्त्या तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments