‘अजिओ ब्यूटी’चा १,५०० हून अधिक ब्रँड्ससह शुभारंभ; १९ हजार पिन कोडवर मिळणार डिलिव्हरी
मुंबई, २३ सिटी न्यूज नेटवर्क
अजिओवर आधीपासून उपलब्ध असलेल्या ब्युटी उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करत रिलायन्स रिटेलने ‘अजिओ ब्यूटी’ हे नवे व्यासपीठ लॉन्च केले आहे. या नव्या ब्युटी डेस्टिनेशनवर ग्राहकांना १,५०० हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची स्किनकेअर, मेकअप, हेअरकेअर, फ्रॅग्रन्स आणि पर्सनल केअर उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
‘अजिओ ब्यूटी’वर स्किनकेअर, मेकअप, हेअरकेअर, फ्रॅग्रन्स, बाथ अँड बॉडी, पर्सनल केअर तसेच ब्युटी अॅक्सेसरीजची विस्तृत श्रेणी उपलब्ध असेल. यामध्ये दैनंदिन वापरातील परवडणाऱ्या उत्पादनांपासून ते प्रीमियम आणि लक्झरी ब्रँड्सपर्यंतच्या उत्पादनांचा समावेश असेल. कंपनीच्या माहितीनुसार, या उत्पादनांची डिलिव्हरी देशभरातील १९,००० हून अधिक पिन कोडवर केली जाणार आहे. तसेच, निवडक शहरांमध्ये ‘अजिओ रश’च्या माध्यमातून जलद डिलिव्हरीची सुविधाही उपलब्ध असेल.
या नव्या प्लॅटफॉर्मसाठी रिलायन्स रिटेलने आपल्या ओम्नीचॅनल ब्युटी प्लॅटफॉर्म ‘टीरा’च्या तज्ज्ञतेची सांगड अजिओच्या व्यापक डिजिटल पोहोचेशी घातली आहे. या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना ब्युटी क्षेत्रातील नवे ट्रेंड्स, विविध गरजांनुसार तयार केलेल्या ब्युटी रूटिन्स, घटकांवर आधारित (इंग्रीडिएंट-बेस्ड) माहिती तसेच ग्राहकांच्या वैयक्तिक पसंतीनुसार शिफारसीही मिळणार आहेत.
अजिओच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, फॅशन आणि ब्युटी हे दोन्ही क्षेत्र वेगाने एकमेकांच्या जवळ येत आहेत. ग्राहकांना आता कपड्यांसोबतच मेकअप, स्किनकेअर आणि इतर ब्युटी उत्पादनांच्या माध्यमातूनही आपली वैयक्तिक शैली व्यक्त करायची आहे. ग्राहकांच्या या बदलत्या गरजा लक्षात घेऊनच ‘अजिओ ब्यूटी’ची निर्मिती करण्यात आली आहे.
रिलायन्स रिटेलच्या म्हणण्यानुसार, या लॉन्चमुळे ग्राहकांना फॅशन आणि ब्युटीची खरेदी एकाच प्लॅटफॉर्मवर अधिक पर्याय, जलद डिलिव्हरी आणि सुलभ अनुभवासह करता येणार आहे.

Comments
Post a Comment