आजचे राशीभविष्य
सोमवार, ३ ऑगस्ट २०२६.
*शुभ कालावधी*
सकाळी ८.२० ते सकाळी ९.२५ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
सकाळी ९.२५ ते सकाळी १०.३० - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
सकाळी १०.३० ते सकाळी ११.३५ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
सकाळी ११.३५ ते दुपारी १२.४० - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.
दुपारी १२.४० ते दुपारी १.४५ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
दुपारी १.४५ ते दुपारी २.५० - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
दुपारी २.५० ते दुपारी ३.५५ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
दुपारी ३.५५ ते संध्याकाळी ५.०० - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
३ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर गुरु, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला इतरांशी सहज संवाद साधता येतो. दया, न्याय, सात्विकता, नैतिकता, परोपकार ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही सहसा संयमी असतात मात्र ज्या वेळी शनीचा प्रभाव वाढतो त्यावेळी तुम्ही भावना प्रधान होतात. तुम्हालाया स्वतःचे काम स्वतः करायला आवडते. इतरांची ढवळाढवळ चालत नाही. तुम्ही महत्वाकांक्षी असून एखादी योजना पार पाडायची असेल तेव्हा तुम्हाला एकटे राहणे आवडते. तुमचा ओढा बंधुमान , संशोधक, हुशार व्यक्तीकडे असतो. तुम्हा जीवनात चांगले यश मिळते. तुमचा सतत उत्कर्ष होतो. तुम्ही एक उत्तम न्यायाधीश, धर्मगुरू, शिक्षक बनू शकतात. तुम्ही स्वयंपूर्ण आहात. तुम्हाला दिखाऊपणा आणि मोठ्याने बोलण्याची सवय असू शकते. तुमचे मन तरुण आणि स्वच्छंदी आहे. तुम्हाला मैदानी खेळांची आवड असते. तुम्ही सहिष्णू आणि विश्वासार्ह आहात. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून तुम्ही जागरूक राहणे आवश्यक आहे.
व्यवसाय:- न्यायमूर्ती, सेक्रेटरी, राजदूत, मुत्सद्दी, उच्चपदस्थ अधिकारी, संरक्षण खाते, प्राध्यापक, धार्मिक प्रवचनकार, डॉक्टर, शिक्षक, मोल्डिंग, तेल गिरण्या, शेती, जंगल, कारखाने, लाकूड, खनिज द्रव्य, खाद्यपदार्थ.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, लसण्या, अमेथीस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
सोमवार, ३ ऑगस्ट २०२६
आषाढ कृष्ण पंचमी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
⏰ राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
🌙 चंद्र नक्षत्र - उ. भाद्रपदा / रात्री ८.०१ नंतर रेवती.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.
✨ आज उत्तम दिवस आहे. रवी आश्लेषा नक्षत्रात.
🔭 रवी त्रिकोण चंद्र.
🔭 चंद्र त्रिकोण गुरू.
🔭 चंद्र युती शनी.
🔭 चंद्र लाभ हर्षल.
🔭 चंद्र युती नेपच्यून.
📌 टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
🐏 मेष:-
भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवासाचे नियोजन यशस्वी होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील.
🐂 वृषभ:-
आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. नियोजनबद्ध कामातून यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
👬 मिथुन:-
संवादकौशल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
🦀 कर्क:-
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
🦁 सिंह:-
संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आत्मविश्वास वाढेल.
🌾 कन्या:-
घरगुती वातावरण सुखद राहील. मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. मानसिक समाधान लाभेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
⚖️ तुळ:-
पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवास लाभदायक ठरेल. महत्त्वाच्या चर्चेत यश मिळेल.
🦂 वृश्चिक:-
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होतील. गुंतवणूक विचारपूर्वक करा.
🏹 धनु:-
मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजना यशस्वी ठरतील. आर्थिक प्रगती होईल.
🐐 मकर:-
खर्चावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. मानसिक शांतता लाभेल.
🏺 कुंभ:-
मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.
🐟 मीन:-
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. रवी-चंद्र त्रिकोण व चंद्र-गुरू त्रिकोण योगामुळे भाग्याची उत्तम साथ लाभेल. चंद्र-शनी युतीमुळे जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल, तर चंद्र-हर्षल लाभ योगामुळे नवीन संधी प्राप्त होतील. चंद्र-नेपच्यून युतीमुळे कल्पकता वाढेल, मात्र भावनिक निर्णय टाळा.
📿 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 8087520521

Comments
Post a Comment