आजचे राशिभविष्य
गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६
आषाढ कृष्ण अष्टमी / संध्याकाळी ६.५३ नंतर नवमी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आजचा दिवस चांगला असून महत्त्वाची कामे, आर्थिक व्यवहार आणि नवीन निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे."
नक्षत्र - भरणी / रात्री ८.१४ नंतर कृतिका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष.
रवी केंद्र चंद्र.
चंद्र लाभ बुध.
टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढेल. नवीन कामांना चांगली सुरुवात होईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.
वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. दैनंदिन कामे सुरळीत पूर्ण होतील.
मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
चंद्र-बुधाच्या शुभ प्रभावामुळे संवादकौशल्याचा लाभ होईल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. प्रवास लाभदायक ठरेल.
कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.
सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भाग्याची साथ लाभेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. सर्जनशील कार्यात प्रगती होईल. मान-सन्मान वाढेल.
कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
विचारपूर्वक घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. घरगुती कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.
तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवासाचा योग संभवतो. आर्थिक लाभ मिळेल.
वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
बोलण्यातील प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन योजना यशस्वी ठरतील.
मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामात अपेक्षित यश मिळेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
संयमाने काम केल्यास लाभ मिळेल. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. मानसिक शांतता लाभेल.
मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. दिवस समाधानकारक जाईल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521


Comments
Post a Comment