आजचे राशीभविष्य
रविवार, ९ ऑगस्ट २०२६.
*शुभ कालावधी*
सकाळी ८.२१ ते सकाळी ९.२६ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३१ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
सकाळी १०.३१ ते सकाळी ११.३५ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
सकाळी ११.३५ ते दुपारी १२.४० - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
दुपारी १२.४० ते दुपारी १.४४ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
दुपारी १.४४ ते दुपारी २.४९ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
दुपारी २.४९ ते दुपारी ३.५३ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.
दुपारी ३.५३ ते दुपारी ४.५८ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त
साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.
डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६
बारसे - १,३,५,१५,१६,३०
जावळ - ५,९,२६,२७,२८.
गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.
९ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुमच्यावर मंगळ, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यावर मंगळ ग्रहाचा अंमल असल्यामुळे तुमच्यात आक्रमकता, प्रतिकार, धाडस, तत्परता असते. तुम्ही लढाऊ वृत्तीचे असतात. तुम्ही ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबत नाही, पराभव ही गोष्ट तुम्हाला मान्य नसते. शक्यतो दुसऱ्यावर टीका करू नये शब्द काळजीपूर्वक वापरावे. मनाने विशाल असून तुम्हाला मानवी जीवनाची उत्तम जाण असते. कोणत्याही समाजात मिसळण्याची वृत्ती, हरहुन्नरीपणा यामुळे इतरांना तुम्ही प्रिय असतात. इतरांना उत्साह जोम या गोष्टी देणे हे तुमचे आयुष्यातील कार्य असते. तुमचा स्वभाव तापट आहे. पण तुम्ही धाडसी असतात. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची, दोन हात करण्याची कुवत तुमच्याकडे असते. खेळाची व शक्तिशाली व्यायामाची तुम्हाला आवड असते. भांडण सारख्या गोष्टींची भीती वाटत नाही. मित्रांबद्दल आदर असून वेळप्रसंगी त्यांच्यासाठी लढता. दुबळ्या लोकांबद्दल दया व आदर असतो. प्रवास खूप करतात. त्यामुळे सहनशीलता व आपलेपणा निर्माण होतो दृष्टिकोन विशाल होतो. सभोवतालच्या लोकांपेक्षा तुमचे विचार फार पुढे गेलेले असतात त्यामुळे इतर लोक तुमच्या सल्ला घेतात .मित्र नातेवाईकांना मदत पैशाची मदत करण्यापूर्वी विचारपूर्वक करावी. पैशाच्या बाबतीत नशीबवान असून सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो. खर्चिक वृत्ती असून प्रिय लोकांसाठी खर्च करताना मागेपुढे पाहत नाही. महत्त्वकांक्षी माणसाची तुम्ही उत्तम पत्नी होऊ शकतात. विनोदी स्वभाव व बोलण्याचे कौशल्य असल्याने सार्वजनिक जीवनात यशस्वी होता. घर उत्तम सांभाळतात. उत्साहाने पतीला चांगली साथ देऊ शकता. सहनशीलता ,स्वार्थ त्याग हे तुमची वैशिष्ट्य आहे.
शुभ दिवस:- सोमवार मंगळवार ,गुरुवार ,शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा शुभ्र, तांबडा ,पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज ,मोती माणिक.
(रत्ने घेण्यापूर्वी पत्रिका तपासून घ्या)
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
रविवार, ९ ऑगस्ट २०२६
आषाढ कृष्ण एकादशी / सकाळी ११.०६ नंतर द्वादशी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
राहुकाळ - सायंकाळी ४.३० ते ६.००
आज चांगला दिवस आहे. एकादशीच्या पुण्यप्रभावामुळे आध्यात्मिक कार्य, महत्त्वाचे निर्णय आणि नवीन योजना यासाठी दिवस अनुकूल आहे.
नक्षत्र - मृग / दुपारी २.४४ नंतर आर्द्र.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन. *कामीका एकादशी* गुरू पूर्व दर्शन.
चंद्र युती मंगळ.
चंद्र केंद्र शुक्र.
चंद्र केंद्र नेपच्यून.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्र-मंगळ युतीमुळे उत्साह आणि धाडस वाढेल. महत्त्वाची कामे वेगाने पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. चंद्र-शुक्र केंद्र योगामुळे सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल.
मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. चंद्र-मंगळ युतीमुळे कार्यक्षमता वाढेल. नवीन योजना यशस्वी ठरतील आणि महत्त्वाच्या कामात प्रगती होईल.
कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.
सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
घरगुती कामे मार्गी लागतील. मालमत्तेसंबंधी निर्णय लाभदायक ठरतील. मानसिक समाधान लाभेल.
तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
भागीदारीच्या कामात लाभ मिळेल. बोलण्याचा प्रभाव वाढेल. नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरतील.
वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळा.
धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवासाचे योग संभवतात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. भाग्याची साथ मिळेल.
मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. संयमाने काम करा.
कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. दिवस समाधानकारक जाईल.
मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
चंद्र-नेपच्यून केंद्र योगामुळे सर्जनशीलता वाढेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521



Comments
Post a Comment