आजचे राशीभविष्य
सोमवार, १० ऑगस्ट २०२६.
शुभ कालावधी
सकाळी ८.२२ ते सकाळी ९.२६ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन व्यवसाय सुरुवात.
सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३१ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
सकाळी १०.३१ ते सकाळी११.३५ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
सकाळी ११.३५ ते दुपारी १२.४० - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.
दुपारी १२.४० ते दुपारी १.४४ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
दुपारी १.४४ ते दुपारी २.४९ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
दुपारी २.४९ ते दुपारी ३.५३ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
दुपारी ३.५३ ते दुपारी ४.५८ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन करार.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त
साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.
डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६
बारसे - १,३,५,१५,१६,३०
जावळ - ५,९,२६,२७,२८.
गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
१० ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. तुमच्या ज्ञानामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे इतरांवर तुमची छाप पडते. नातेवाईकांपासून तुम्हाला फायदा होतो. वयाच्या ४६ पासून तुम्हाला यश मिळते. तुम्ही मोठ्या पदावर असतात. व्यावसायिक यश देखील तुमहाल लाभते. तुमच्यात प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असतो. तुमच्या विचारशक्ती मुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळते. तुम्ही सशक्त असतात. तुम्हाला इतरांकडून फारशी मदत मिळत नाही. कल्पकता, चपळता, हुशारी हे गुण तुमच्यात उपजतच आहेत. तुम्ही निसर्गाशी सहज एकरूप होतात. जीवनाचा आनंद उपभोगतात. स्वभाव काहीसा शंकेखोर आहे. निर्णय घेण्यास उशीर लागतो. सामाजिक कामाची तुम्हाला आवड असली तरी जीवनात तुम्हाला एकटेपणा जाणवतो. तुम्ही एक नैसर्गिक कलाकार असून स्वभाव हरहुन्नरी आहे. तुम्हाला कोणत्याही विषयाचे चटकन आकलन होते. तुम्ही सभा गाजवू शकतात. तुम्हाला नातेवाईकांमुळे त्रास होऊ शकतो आणि एखाद्या आजारी माणसाची जबाबदारी तुमच्यावर पडते. तुम्ही सुखी, तेजस्वी , साहसवादी आणि ध्येयवादी आहात. तुमच्यात संशोधन करण्याची शक्ती आहे. तुमचा मानसशास्त्राचा अभ्यास चांगला असतो. गूढ गोष्टींची आवड असते. तुम्ही नेतृत्व करणारे आहेत मात्र कल्पनाविलासात रमणे तुम्हाला जास्त आवडते. कोणताही विषय ठराविक पद्धतीने हाताळणे तुम्हाला आवडते. शास्त्र, संशोधन, शोध प्रबंध यात तुम्हाला रस असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः आणि त तेही झटपट घेतात. विविध मैदानी खेळांची आवड असते. तुम्ही अत्यंत उतावीळ असतात. इतरांची सिक्रेटस तुम्ही जपून ठेवतात. त्याचा गैरवापर किंवा उच्चार करत नाहीत. तुम्ही यशस्वी, प्रामाणिक आहेत. मात्र तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. बोलण्यापेक्षा लेखनातून तुम्हीं अधिक चांगले व्यक्त होऊ शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि ज्ञानामुळे इतरांच्या मनात तुमच्याबद्दल आदराची भावना निर्माण होते. वडील, सासरे, बायको, आई इत्यादी नातेवाईकांच्या मुळे तुम्हाला आर्थिक फायदा होतो. तुम्ही नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत असतात आणि तुम्हाला धंद्यातही यश मिळते. तुम्ही प्रामाणिक आहात. स्वतःच्या विचारशक्तीमुळे आणि स्वभाव वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला कीर्ती मिळते किंवा कधी कधी अपकीर्ती देखील होऊ शकते. तुमचे आरोग्य चांगले असते आणि आजारपणातून तुम्ही लवकर बरे होतात. तुम्ही चाकोरीच्या बाहेर जाऊन इतरांना मदत करतात. मात्र तुम्हाला तसेच सहकार्य मिळेलच असे नाही. तुम्ही अत्यंत कल्पक, चपळ, उत्साही आणि कला प्रिय आहात. तुम्हाला निसर्गाची आवड आहे. जीवनातला आनंद तुम्ही उपभोगत असतात. तुमचा स्वभाव काहीसा संशयी आहे आणि निर्णय घेण्यास तुम्हाला वेळ लागतो. तुम्ही समाजाच्या सर्व थरामध्ये सहज मिसळू शकतात. अनेकदा तुम्हाला एकटेपणा जाणवतो. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. बऱ्याच विषयाचे तुम्हाला चटकन आकलन होते. तुमची इच्छा शक्ती जबरदस्त आहे. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत. तुम्ही आशावादी असतात. कधी कधी तुम्ही अधिक काटकसरी आणि व्यवहारिक होतात. दुराग्रही स्वभाव, इतरांवर टीका करणे आणि त्यांचे दोष दाखवणे तुम्ही टाळले पाहजे.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शक, मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, कॅन्टीन, बँकिंग, सेल्स मॅनेजर, पुस्तक विक्रेता, आणि आयात निर्यात अधिकारी.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, मंगळवार.
शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, जांभळा.
शुभ रत्न:- माणिक, पुष्कराज, अंबर.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
सोमवार, १० ऑगस्ट २०२६
आषाढ कृष्ण द्वादशी / त्रयोदशी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - आर्द्र / दुपारी १२.३७ नंतर पुनर्वसू.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क.
आजचा दिवस मध्यम ते शुभ राहील. क्षय तिथी असल्याने महत्त्वाची कामे विचारपूर्वक करावीत. आज *सोमप्रदोष* संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा.
चंद्र केंद्र शनी.
शुक्र प्रतियुती नेपच्यून.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-
कामात संयम ठेवा. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. घाईघाईत निर्णय घेणे टाळा.
वृषभ:-
व्यवसायात नवीन संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल. प्रवासात काळजी घ्या.
मिथुन:-
संवादकौशल्यामुळे लाभ होईल. विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.
कर्क:-
राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यास योग्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह:-
अनावश्यक खर्च टाळा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. विश्रांतीलाही महत्त्व द्या.
कन्या:-
कामात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नियोजनबद्ध कामातून यश मिळेल.
तुळ:-
भाग्याची साथ लाभेल. प्रवास लाभदायक ठरेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.
वृश्चिक:-
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. महत्त्वाची कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्या. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. संयम ठेवा.
धनु:-
भागीदारीच्या कामात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. नवीन योजना यशस्वी ठरतील.
मकर:-
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल.
कुंभ:-
विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. सर्जनशील कार्यात यश मिळेल.
मीन:-
घरगुती वातावरण आनंददायी राहील. मानसिक समाधान लाभेल. आर्थिक व्यवहारात संयम ठेवा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
8087520521

Comments
Post a Comment