विश्व हिंदू परिषदेच्या उत्तर कोल्हापूर जिल्ह्यात विविध पदांवर नियुक्त्या
कोल्हापूर 18 सिटी न्यूज नेटवर्क
विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताची बैठक दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे पार पडली. या समयी केंद्रीय सह मंत्री श्री दादा वेदकजी, क्षेत्रीय संघटन मंत्री श्री अनिरुद्ध उर्फ अण्णा पंडितजी, प्रांत मंत्री किशोर जी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. बैठकीमध्ये संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेऊन उत्तर कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी संघटनात्मक कार्य अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
श्री. सुनील शिंदे ठाकूर — जिल्हा सहमंत्री, विश्व हिंदू परिषद.
श्री. सागर मेथे — जिल्हा संयोजक, बजरंग दल
श्री. ओंकार राजपूत — जिल्हा सहसंयोजक, बजरंग दल
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उत्तर कोल्हापूर जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे संघटन अधिक मजबूत करणे, युवकांचे संघटन, सामाजिक कार्य, हिंदू समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय वाढविणे तसेच संघटनेच्या विविध उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्यात येणार आहे.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे विश्व हिंदू परिषद उत्तर कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या प्रसंगी जिल्हामधून जिल्हा मंत्री श्री विनयजी बारड, जिल्हा अध्यक्ष श्री शांतीभाई लिंबाणी, जिल्हा सह मंत्री श्री रावसाहेब चौगुले उपस्थित होते

Comments
Post a Comment